घरमुंबईराज ठाकरेंवर बोलण्याची अंजली दमानियांची लायकी नाही - रिटा गुप्ता

राज ठाकरेंवर बोलण्याची अंजली दमानियांची लायकी नाही – रिटा गुप्ता

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे वादग्रस्त ट्विट शेअर केले होते. त्यावर आता सरचिटणीस रिठा गुप्ताने चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे वादग्रस्त ट्विट शेअर केले होते. त्यावर आता मनसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत. याकरत संपूर्ण ठाकरे कुटुंबिय यांच्यासोबत फोर्टला जाण्याकरता निघाले. यावर अंजली दमानिया यांनी मिश्किलपणे राज ठाकरे चौकशीला जात आहेत की, सत्यनारायणाच्या पूजेला, असे ट्विट करत त्यांची खिल्ली उडवली. यावर मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे. ‘तुझ समाजिक कार्य घरी कराव. आम्हाला शहाणपणा शिकवू नका. तुझी राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी ही नाही आणि कुवत देखील नाही आहे‘.

सत्यनारायणाची पूजा काय असते हे घरी येऊन दाखवू – रिटा गुप्ता

सत्यनारायणाची पूजा काय असते हे घरी येऊन दाखवू – रिटा गुप्ता

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 22, 2019

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया 

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, अशी खिल्ली अंजली दमानिया यांनी उडवली आहे. तर बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या बातमीवरदेखील मनसैनिकांनी अंजली दमानिया यांचा खरमरीत समाचार घेत कमेंट केले आहेत.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे 

अशा कठिण प्रसंगी आम्ही सर्व कुटुंबिय एकत्र आहोत. सात जन्म सुख-दुःखात एकत्र राहण्याचे ठरवले आहे. त्यामुळे याही वेळी एकत्र अडचणीचा सामना करत आहोत, असे मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तर अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटरमध्ये अंजली दमानिया यांना भाजपचा एजंट म्हणून संबोधले आहे. तसेच आम्ही सत्यनारायणाच्या पूजेला निघालो आहोत की, तुमच्या अंतयात्रेला हे लवकरच कळेल, असेही नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अंजली दमानिया यांच्या ट्विटला मनसेचे खरमरीत उत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -