घरमनोरंजन'या' चिमुरड्याला ओळखलंत का?

‘या’ चिमुरड्याला ओळखलंत का?

Subscribe

बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या रणवीर सिंग हा वेगळ्या अभिनय शैलीने आघाडीचा अभिनेता आहे. तो आगामी ’83’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी यूकेमध्ये व्यग्र आहे. आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी रणवीर सिंग सोशल मीडियावर आपल्या कामबद्दल किंवा वेगळ्या ड्रेसिंग स्टाईलचे फोटो शेअर करत असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर स्वतःचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने बालपणीचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये त्याची बहीण अंजू भवानी देखील दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने लाल रंगाचा रेनकोट आमि निळ्या रंगाचे स्पोर्टस शूज घातले आहेत. तसेच तो हसत हसत अंगठा दाखवताना दिसत आहे. ‘सर्व काही चांगले आहे’, असं त्याने कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

?? all good in the hood ?

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

तसेच अभिनेता वरुण धवन आणि दिग्दर्शक शानू शर्मी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरने ही पोस्ट शेअर केली आहे. वरुण धवन या फोटोला ‘बॅलर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या चाहत्यांनी बालपणीच्या या फोटोचे खुप कौतुक केलं आहे.

’83’ या चित्रपटामध्ये रणवीर सिंग हा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरने या भूमिकेचा त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी त्याने एक गौप्यस्फोट केला होता. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेला मुलाखतीत त्याने एक खुलासा केला. त्या मुलाखतीत त्याला कंडोमची जाहिरात कशी मिळाली या संदर्भात बोलत होता. त्यावेळी त्याने असा खुलासा केला की, ‘मी १२ वर्षांचा असताना केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते.’ असं तो म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -