घरमुंबईविलेपार्ले रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस अटक

विलेपार्ले रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस अटक

Subscribe

विलेपार्ले रेल्वे स्थानकात एका 24 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. शकील शब्बीर कुरेशी असे या 30 वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शकील हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवाशी असून तो नोकरीसाठी मुंबई शहरात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.

24 वर्षांची ही तरुणी एअरपोर्टवर कामाला आहे. रविवारी सकाळी सहा वाजता ती तिच्या एका मैत्रिणीसोबत कामाला जाण्यासाठी घरातून निघाली. विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवरुन जात असताना अचानक समोरुन आलेल्या एका तरुणाने तिचे दोन्ही हात पकडले. हात पकडल्यानंतर तो तिच्याशी अश्लील वर्तन करु लागला. अचानक घडलेल्या प्रकारानंतर या तरुणीसह तिची मैत्रिण प्रचंड घाबरुन गेल्या. त्यांनी आरडाओरड करुन लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर तिथे उपस्थित इतर प्रवाशांनी या तरुणाला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या तरुणीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. शकील रविवारी विलेपार्ले रेल्वे स्थानकात फिरत होता. यावेळी त्याने समोरुन येणार्‍या तक्रारदार तरुणीचे दोन्ही हात पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करुन केले. याच गुन्ह्यात त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -