घरमुंबईठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर !

ठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर !

Subscribe

२३ जणांची यादी पोलिसांकडे ...

माहितीच्या अधिकाराचा वापर करून खंडणी उकळणार्‍या माहिती अधिकार कार्यकत्यांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केल्यानंतर आता कायद्याचा दुरूपयोग करणार्‍या माहिती अधिकार कार्यकत्यांचीच, माहिती जमविण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. ठाण्यातील २३ माहिती अधिकारी कार्यकत्यांची यादी पोलिसांकडे आहे. येत्या काही दिवसांत वादग्रस्त माहिती अधिकारी कार्यकत्याविरोधात पोलिसांचा फास आवळणार असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळेत आता माहिती अधिकार कार्यकर्ते हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

ठाण्यातील हिरानंदानी बिल्डर्स आणि बीट कॉन यांची माहितीच्या अधिकारात, माहिती मागवून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुधीर बर्गे, शौकत मुलानी आणि अरिफ ईराकी या तिघांना शनिवारी खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ठाण्यात माहिती अधिकार कार्यकत्यांचे एक रॅकेट सक्रीय आहे. मोठ्या विकासक आणि कंत्राटदारांची किंवा कामांची माहिती मागवून खंडणी उकळण्याचे काम हे रॅकेट करत आहे. मुंबईहून ठाण्यात येणार्‍या बांधकाम व्यावसायिकांकडे यांची नजर असायची. गेल्या काही वर्षांपासून हे रॅकेट कार्यरत होते. प्रत्येकाने आरटीआय अंतर्गत सुमारे दीड हजारावर अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारी दाखल केल्यानंतर पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास कोर्टात याचिका दाखल करणे आणि तडजोड झाल्यानंतर याचिका मागे घेणे असे प्रकार घडले आहेत.

- Advertisement -

विकासक कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकार्‍यांकडे खंडणी मागितल्याच्या अनेक तक्रारी असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ठाण्यातील सुमारे २३ माहिती अधिकारी कार्यकत्यांची यादी पालिकेने पोलिसांना सादर केली आहे. तीनजणांच्या अटकेनंतर या रॅकेटमध्ये कोण कोण आहेत, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. तीनजणांच्या अटक सत्रानंतर माहिती अधिकारी कार्यकत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अनेक माहिती अधिकारी कार्यकत्यांची पळापळ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -