घरमुंबईसगळ्यांना विसरून तुम्ही नेहमी 'सिल्वर ओक'कडे झुकले; शेलारांची राऊतांवर टीका

सगळ्यांना विसरून तुम्ही नेहमी ‘सिल्वर ओक’कडे झुकले; शेलारांची राऊतांवर टीका

Subscribe

संजय राऊत यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून, आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून सध्या राज्यात चर्चा सुरू असून, राज्यपालांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना भाजपकडून देखील जशासतसे उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून, आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे. एवढेच नाही तर आशिष शेलार यांनी तुम्ही नेहमी सिल्वर ओककडे झुकले, अशी खोचक टीका केली आहे.

काय म्हणालेत नेमकं आशिष शेलार 

दरम्यान आशिष शेलार यांनी दोन ट्विट केली असून, पहिल्या ट्विटमध्ये ‘कोरोनाच्या या युध्दात राज्यपालांवर अनाठायी राजकीय टीका करणे पत्रपंडितांच्या अंगाशी आले. पक्षाच्या नेत्यांना राजभवनावर धावाधाव करावी लागली. म्हणून पत्रपंडितांनी आज “रोखठोक” मध्ये “टिक टॉक” करुन आता स्वतःच्या अंगाशी आलेले झटकण्याची केविलवाणी धडपड केली’, असे म्हटले आहे तर दुसऱ्या ट्विटमध्ये ‘अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय? कृष्णकुंजमुळे मातोश्रीवर पोहचले… मातोश्रीमुळे संसदेत पोहचले… पण पत्रपंडित हो, इतिहास विचारु शकतो तुम्हाला… महोदय, का या सगळ्यांना विसरुन तुम्ही नेहमीच “सिल्वरओक” कडे झुकले?’ असे खोचक ट्विट केले आहे.

- Advertisement -

समझने वालों को इशारा काफी है!- राऊत 

‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान 9 एप्रिलच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर जाण्यासाठी एकमत झाले. तसा प्रस्ताव तातडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे गेला मात्र अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही.


गर्दी करू नका, लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहणार – मुख्यमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -