घरताज्या घडामोडी'या' कारणामुळे रामायणातील राम सरकारवर नाराज!

‘या’ कारणामुळे रामायणातील राम सरकारवर नाराज!

Subscribe

रामायण मालिकेतील अरूण गोविल यांची भुमिका प्रचंड गाजली. मालिका संपल्यानंतरही पुढे अनेक वर्ष लोकं त्यांना राम समजूनच नमस्कार करायचे.

लॉकडाऊनमध्ये दुरदर्शनवर पुन्हा एकदा ९० च्या दशकातील गाजलेला मालिका प्रदर्शित केल्या जाऊ लागल्या आणि प्रेक्षकांनी या मालिकांना भरघोस प्रतिसाद दिला. रामायण, महाबारत या मालिकांना पुन्हा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकांमुळे दुरदर्शनही टीआरपीमध्ये नंबर १वर आलं. या मालिकेतील सर्वच पात्र सध्या चर्चेत आहेत.  या पात्रांशी संबंधीत अनेक बातम्या सध्या पुढे येत आहेत. अशातच रामायणात श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

अरुण गोविल यांनी ट्विटद्वारे एका वृत्तवाहिना मुलाखत दिली. दरम्यान त्यांना तुमचे अभिनय क्षेत्रात कमालीचे योगदान आहे, खासकरुन रामायणात.. पण तुम्हाला त्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले नाही…? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अरुण गोविल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘मला आजपर्यंत कोणत्याही सरकारकडून सन्मान मिळालेला नाही. मी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. पण तिकडच्या सरकारने देखील मला आजपर्यंत सन्मान दिलेला नाही. तसेच पाच वर्ष मी मुंबईमध्ये राहत होतो. पण महाराष्ट्र सरकारने देखील मला कोणताही सन्मान दिलेला दिलेला नाही’ असे प्रश्नाला उत्तर देताना ट्वीटमध्ये अरूण गोविल यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

रामायण मालिकेतील अरूण गोविल यांची भुमिका प्रचंड गाजली. मालिका संपल्यानंतरही पुढे अनेक वर्ष लोकं त्यांना राम समजूनच नमस्कार करायचे. मात्र या मालिकेनंतर त्यांचे करिअर संपल्याचे खुद्द अरुण गोविल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. मला रामायणापूर्वी अनेक चित्रपट मिळाले पण रामायणानंतर चित्रपटाच्या ऑफर येणे बंद झाले’ असे त्यांनी म्हटलं आहे.


हे ही वाचा – गर्दी करू नका, लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहणार – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -