घरमुंबईAtal Setu : अटल सेतू हायस्पीड; वाहनांची वेगमर्यादा ताशी शंभर किलोमीटर

Atal Setu : अटल सेतू हायस्पीड; वाहनांची वेगमर्यादा ताशी शंभर किलोमीटर

Subscribe

मुंबई : बहुप्रतिक्षेत असा शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग शुक्रवारी (12 जानेवारी) उद्घाटनानंतर खुला होणार आहे. या मार्ग हायस्पीड असून, मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 ते 22 मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनांची वेगमर्यादा ही ताशी तब्बल शंभर किलोमीटर एवढी असणार आहे हे विशेष. (Atal Setu Atal Setu High Speed The speed limit of vehicles is 100 kilometers per hour)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) स्पष्ट करण्यात आले आहे की, शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग 12 जानेवारी रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 22 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे हा महामार्ग किती हायस्पीड असणार हे यावरून दिसून येते. वेगाने अंतर कापता येणाऱ्या मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात अटल सेतू प्रकल्पाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या सागरी सेतूवरून वाहनचालकांना ताशी शंभर किमी वेगाने वाहने चालविता येणार असल्याचीही माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

- Advertisement -

400 कॅमेऱ्यांचा असणार वॉच

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी रोजी लोकार्पण होत असलेल्या अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा (Intelligent Traffic Management) सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी अटल सेतू 13 जानेवारीपासून खुला होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा लोकार्पणाच्या आधी केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs AFG : दीड वर्षानंतर मोहालीच्या मैदानावर उतरणार टीम इंडिया; पहिला T-20 सामना Afghanistan सोबत

- Advertisement -

वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

अटल सेतूवर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना वेग मर्यादेचं पालन करावं लागणार आहे. जे वाहनधारक वेगमर्यादेचं पालन करणार नाहीत अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. हा सेतू वाहतुकीसाठी सेवेत आल्यानंतर यावरून दिवसाला 70 हजार वाहने धावण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. अटल सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

हेही वाचा : Goa Murder Case : प्लॅन बनवून सूचना सेठ गोव्यात; आधी चार वर्षीय मुलाला कफ सिरप पाजले आणि त्यानंतर…

ही आहेत अटल सेतूची वैशिष्ट्यं

अटल सेतू हा मार्ग तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली अनेक वर्ष निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू शिवडी इथून सुरू होतो. ज्या ठिकाणावरून एमटीएचएलची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रीमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -