घरलाईफस्टाईलऑफिसमध्ये प्रोफेशनल इमेज जपण्यासाठी या गोष्टींकडे द्या लक्ष

ऑफिसमध्ये प्रोफेशनल इमेज जपण्यासाठी या गोष्टींकडे द्या लक्ष

Subscribe

कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेले काम तुम्ही पूर्ण करणे इतकंच महत्वाचे नसते. तर याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली तुमची प्रतिमा बिघडू शकते. ऑफिसमधले तुमचे काम हे महत्त्वाचेच आहे, पण यासोबतच तुमचे ऑफिसमधील प्रेझेंटेशन, कार्यालयातील इतरांसोबत असलेले संबंध, तुमच्याबद्दल इतरांचे काय म्हणणे आहे ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. कारण या सर्व गोष्टींचा तुमच्या कामाच्या प्रोग्रेसवर परिणाम होत असतो.

Hybrid work: Getting back to the office| Adobe Blog

- Advertisement -

तुम्ही नुकतेच कुठे कामाला लागले असाल किंवा एखाद्या ठिकाणी इंटर्न म्हणून काम करत असाल तर अशावेळी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ऑफिसमध्ये प्रोफेशनल इमेज जपण्यासाठी तुम्हाला मदत करतील, पाहुयात

गॉसिपिंग टाळा –
जवळपास दिवसाचा अर्धा वेळ आपण ऑफिसमध्ये असतो. त्यामुळे आपल्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी आपला संवाद न होणे हे अशक्य आहे. असे असले तरी सहकाऱ्यांशी काय आणि कसे बोलायचे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जर गप्प बसलात तर तुम्हाला अहंकार आहे असे समजले जाईल आणि तुमच्या बाबतीत गैरसमज वाढू लागतील. त्याचवेळी जास्त बोलणे हे सुद्धा चांगले मानले जात नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी संवाद ठेवा पण गॉसिपिंग करणे टाळले पाहिजे.

- Advertisement -

फोन सायलेंट ठेवा –
कामाच्या ठिकाणी इतरांना त्रास होऊ नये यासाठी फोन सायलेंट किंवा व्हायब्रेट वर ठेवायला हवा. शांततेत काम करत असताना अचानक फोन वाजला तर इतर कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो.

परफ्युमचा वापर करणे –
काही जणांना अति प्रमाणात परफ्युम किंवा डार्क परफ्युम वापरण्याची सवय असते. पण अशाने इतर सहकाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लाईट अथवा तुम्हाला जास्तच घामाचा त्रास असेल तर अधूनमधून परफ्युमचा वापर तुम्ही करू शकता.

सोशल मीडियावर सावधपणा बाळगा –
आजकाल सर्वजण सोशल मीडिया युझर्स झाले आहेत. पण काहींना वैयक्तिक आयुष्यव्यतिरिक्त, इतर ठिकाणचे जसे की ऑफिसचे काम, सहकाऱ्यांचे वागणं-बोलणे सहजपणे सोशल मीडियावर पोस्ट करायला आवडते. तुम्हाला यात काही नुकसान दिसत नाही. पण, याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

 


हेही वाचा ; बॉसी महिला म्हणजे कणखऱ नेतृत्व

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -