घरमुंबईबाळासाहेबांचे विचार होते की, गद्दारांना रस्त्यावर...; बंडखोरांना या गोष्टीची भीती

बाळासाहेबांचे विचार होते की, गद्दारांना रस्त्यावर…; बंडखोरांना या गोष्टीची भीती

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही आमदारांनी शिवसेना सोडून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि आमदारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, बाळासाहेबांचे विचार होते की, गद्दारांना रस्त्यावर पकडून त्यांचे कपडे काढून लोकांनी मारले पाहिजे.

हेही वाचा – अयोध्येत गेलेल्याच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका

- Advertisement -

संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोतलाना वक्तव्य केले की, एकनाथ शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या वारश्याबदद्ल बोलायचा पाहिजे. त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे गद्दार आणि बेइमानच्या विरोधात आयुष्यभर लढले. मग गद्दार देशाचे असूदे किंवा पक्षाचे. पार्टीची फसवणूक करणारे आहेत त्यांना लोकांनी रस्त्यावर पकडून त्यांचे कपडे काढून मारायला पाहिजे, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. जर असे केले तर राजकारणात फसवणुकीचे प्रकार बंद होतील, हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते माझे नाही.

हेही वाचा – मुंबई महापालिकेत शिंदे गटाला अडीच वर्षांसाठी उपमहापौर पद, भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला फॉर्म्यूला

- Advertisement -

एकनाथ शिंदे सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा आदर करतो. मग शिंदे यांनी सांगावे की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करून या गद्दारांना रस्त्यावर पकडून कपडे काढून लोकांनी मारले पाहिजे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, लोक मारतील हा विचार करून गद्दार घाबरत आहेत. म्हणून त्यांना सुरक्षा दिली आहे जी राष्ट्रभक्त किंवा पैसेवाल्या लोकांना मिळत नाही आहे. या गद्दारांच्या सुरक्षेसाठी पुढे दोन पायलट गाड्या आणि मागे पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यता आल्या आहेत. पण जर हे गद्दार इमानदार असतील तर त्यांना कशाची भिती वाटते. या मनात भीती आहे की, बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचे विचार गद्दारांना रस्त्यावर पकडून मारा याची लोक अमलबजावणी करतील आणि यांना मारतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -