घरमुंबईधार्मिक उत्सव साजरा करताना सतर्क रहा; ठाणे पोलीस आयुक्तांचे आवाहन

धार्मिक उत्सव साजरा करताना सतर्क रहा; ठाणे पोलीस आयुक्तांचे आवाहन

Subscribe

धार्मिक उत्सव साजरा करताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर धार्मिक सणांच्यावेळी सतर्कता असणे आवश्यक आहे, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्तांनी केले आहेत.

धार्मिक उत्सव साजरा करताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर धार्मिक सणांच्यावेळी सतर्कता असणे आवश्यक आहे. गणोशोत्सव हा सामाजिक बांधिलकीमधून साजरा करावा, तसेच इतर धर्मिय समाजाच्या भावना दुखावतील, असे वर्तन कोणी करू नये. भिवंडी राष्ट्रीय एकात्मता तसेच बंधूता निर्माण करणारे शहर आहे. त्यामुळे येथे सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव साजरे करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन ठाणो पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

भिवंडी परिमंडळ-२ यांच्यावतीने वऱ्हाळादेवी हॉल, कामतघर येथे सन २०१८ मध्ये राष्ट्रीय एकात्मता तसेच जातीय सलोखा अंतर्गत शहरात गणोशोत्सव देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणोशोत्सव सादर करणाऱ्या मंडळांचा पारितोषीक समारंभ आयोजित केला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, आमदार महेश चौघुले, महापौर जावेद दळवी, सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला, अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, मनपा आयुक्त अशोक रणखांब, गणोश मंडळाचे अध्यक्ष मदन भोई आदी उपस्थित होते. शासनाच्या माध्यमांतून भिवंडीत मेट्रो, उड्डाणपूल, गोदामहब असे विविध उपक्रम राबवले जात असल्याने भिवंडी काही दिवसातच प्रगतीपथावर असणार आहे. त्यामुळे लोकांनी शासकीय कामाला सहकार्य करून अधिकाऱ्यांना मदत करावी, महानगरपालिका प्रशासनाने गणोशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना भेडसावणारे स्वच्छता तसेच खराब रस्ते दुरूस्त करून सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त फणसळकर यांनी केले. भिवंडीत सर्व जातीधर्माची लोकं एकत्र रहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपण हिंदूस्थानी आहोत, ही भावना लक्षात घेऊन धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे. त्यातून एकात्मता व बंधूता निर्माण होईल. एमएमआरडीएच्या माध्यमांतून शहरातील विविध भागात सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे रस्ते तयार होत असून लवकरच लोकांना चांगले रस्ते व सुविधा मिळणार आहेत,अशी माहिती खासदार कपील पाटील यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी गणोशोत्सवाच्या काळात महानगरपालिका प्रशासनाने खराब रस्ते व विसजर्न स्थळे तातडीने दुरूस्त करावे. या काळात विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, अशी मागणी गणोशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आली. यावेळी खोणीगाव युवा अरूण पाटील मित्र मंडळ (प्रथम), धामणकरनाका मित्र मंडळ (प्रथम विशेष) व विविध मंडळाना पारितोषीके देण्यात आली. तसेच निरीक्षण सदस्यचाही गौरव करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -