घरक्रीडाकसोटी रँकिंगमध्ये बुमराहची ७व्या स्थानी झेप!

कसोटी रँकिंगमध्ये बुमराहची ७व्या स्थानी झेप!

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शेवटच्या डावात बुमराहने ५ बळी घेतले. या कामगिरीमुळेच बुमराहच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अँटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्यांदाच टॉप टेनमध्ये स्थान पटकावलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शेवटच्या डावात बुमराहने ५ बळी घेतले. या कामगिरीमुळेच आयसीसी टेस्ट रँकिंगच्या १६व्या स्थानावरून त्याने थेट ७व्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत डावात पाच विकेट मिळविण्याचा विक्रम करणारा तो पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे.

अजिंक्य रहाणेच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात बुमराहने नेत्रदीपक कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याच्या खात्यात ७७४ गुण जमा झाले. त्यामुळे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये १६ व्या स्थानावरुन ७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. बुमराह प्रमाणेच भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. अजिंक्य रहाणेने ११ व्या स्थानावरून १० स्थानावर झेप घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संघासाठी योग्य तोच निर्णय घेणार!

अशी आहे आयसीसी कसोटी क्रमवारी

९०८ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा याने ८५१ गुणांसह दुसरा आणि जेम्स अँडरसनने ८१४ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानी तर स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसनने प्रत्येकी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -