घरमुंबईभिवंडीत डेंग्यूने डोके वर काढले, पालिकेचं कोरड्या दिवसाचं आवाहन

भिवंडीत डेंग्यूने डोके वर काढले, पालिकेचं कोरड्या दिवसाचं आवाहन

Subscribe

भिवंडी महापालिका आयुक्तांनी डेंग्युच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.

भिवंडीत डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असतानाच गेल्या दोन महिन्यात सहा जणांना डेंग्यूच्या आजाराने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाकडून घरोघरी भेटी देऊन एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले जात आहे. सध्या शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर तातडीने करावयाच्या उपाय योजनांसंदर्भात आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येत असून स्वच्छता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

घरोघरी होणार औषध फवारणी

महानगरपालिका खासगी स्तरावर संशयित रुग्णांचे अहवाल संकलन करणे, तापाची लक्षणे दिसताच रक्ताचे नमुने तपासून घेणे, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले तर महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागामार्फत संबंधित कार्यक्षेत्र औषध फवारणी, धुरीकरण फवारणी चालू करण्यात आलेली आहे. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात येत आहेत. वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरोघरी भेटी देऊन एक दिवस कोरडा म्हणजेच घरातील सर्व पाणी रिकामे करणे म्हणजे कोरडा दिवस पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करीत आहेत. तापाची लक्षणे दिसताच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. स्थानिक नगरसेवक आणि समाजसेवी संघटना यांची मदत या कामी घेण्यात येत असून त्यांच्या मार्फत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच सर्वत्र औषध फवारणी करण्यात येत आहे. विशेष करून सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान घरोघरी जाऊन औषध फवारणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

धुरीकरणाचं आवाहन

महापालिकेत पुरेशा प्रमाणात जंतुनाशक पावडर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. घराच्या आजूबाजूला कुंडीत, प्लास्टिक पिशव्या, रस्त्यावर आणि घराच्या छतावर टायर, ट्यूब आणि अन्य कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचणार नाही याकामी घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेचे कर्मचारी धुरीकरणासाठी घरी येतील तेव्हा त्यांच्याकडून धुरीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त आष्टीकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -