घरमुंबईभिवंडी महापालिकेच्या डंपरची धडक

भिवंडी महापालिकेच्या डंपरची धडक

Subscribe

दोघांचा मृत्यू,सहाजण जखमी

भिवंडी महापालिकेच्या कचरा वाहून नेणार्‍या डंपरने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शब्बीर उर्फ राजू खान (40), अहमद मोमीन (32) अशी मृतांची नावे आहेत. तर समीम खान (45), राजकुमार मौर्य ( 40), साजिद अली (27), जमाल शेख (27), मझहर खान (56), गुफरान अंसारी (24) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महापालिकेचा डंपर हा रामनगर चाविंद्रा येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा खाली करून परतत असतानाच डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपरने हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या आठजणांना धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हे सर्व मजूर असून चहा पिण्यासाठी चमन हॉटेलबाहेर बाकड्यावर बसले होते. त्याचवेळी या डंपरने थेट हॉटेलच्या समोर बाकड्यावर बसलेल्या नागरिकांना धडक दिली. डंपरचे ब्रेक फेल झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -