घरमुंबईहद्दपार गुंडांची धरपकड सुरूच !

हद्दपार गुंडांची धरपकड सुरूच !

Subscribe

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सराईत गुंडांच्या विरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी दोन सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. यामध्ये दोन गुंडांची हद्दपारीची मुदत संपलेली नसताना पोलिसांची नजर चुकवून दोघे सराईत गुन्हेगार शहर परिसरात फिरत असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाल्याने या गुंडांना रविवारी रात्री पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.

महेश शंकरलाल सोनी ( 30 रा.गणेशनगर ) व वाहीद रज्जाक शेख उर्फ गडगडम ( 30 रा.युनूसनगर ) असे अटक केलेल्या तडीपार गुंडांची नावे आहेत. या तडीपार गुंडांवर पोलीस उपायुक्तांनी कारवाई करून यातील वाहिद यास दोन वर्षांसाठी ठाणे, पालघर, मुंबई शहर, नवी मुंबई या जिल्हा क्षेत्रातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे, तर महेश यास देखील ठाणे, नवी मुंबई, मुंबई पालघर आदी ठिकाणाहून हद्दपार केले आहे.

- Advertisement -

मात्र या दोघांच्याही हद्दपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच अथवा त्यांनी वास्तव्यासाठी सक्षम अधिकार्‍याची कायदेशीर परवानगी न घेता ते दोघेही परिसरात येवून गुपचूपपणे राहत असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशिकांत खाडे, पोलीस शिपाई रविंद्र पाटील, किरण पाटील व पोलीस हवालदार सुरेश चौघुले यांनी पोलीस पथकासह सापळा लावून या दोघा गुंडांना काश्मीरा ढाबा आणि हनुमान नगर, कामतघर येथून शिताफीने ताब्यात घेवून गजाआड केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -