घरमहाराष्ट्रआदिवासींची ससेहोलपट !

आदिवासींची ससेहोलपट !

Subscribe

आजारी व्यक्तीला चादरीची डोली

कर्जत तालुक्यात विकासाच्या गप्पा मारणार्‍या नेत्यांचे लक्ष आदिवासी भागातील वाड्या-पाड्यापर्यंत पोहचतच नसल्याने तालुक्यात काही ठिकाणी आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी बांधवांना रस्त्या अभावी आजारी व्यक्तीस चादरीच्या डोलीतून दवाखान्यात न्यावे लागते.

सध्या निवडणुकीची गरमागरमी सुरू असल्याने नेते, कार्यकर्ते गावागावात, वाड्या-पाड्यात फिरून मतांचा जोगवा मागत आहेत. एरव्ही ढुंकूनही न पाहणारे राजकारणी आता मात्र निवडणूक काळात प्रचारासाठी आदिवासी भागातील रस्त्यावरील खाचखळग्यांतून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत. आश्वासनांची खैरात वाटत आहेत. हे दर निवडणुकीचे प्रचार सूत्र बनून गेले असले तरी प्रत्यक्षात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजतागायत या भागांचा विकास झाला नाही. किमान रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही आदिवासी वंचित राहिल्याचे दिसत आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथील सखू नारायण पारधी या महिलेला दवाखान्यात उपचाराकरिता चादरीची डोली करून नेण्यात आले. रस्त्या अभावी या वाडीत कोणतेही वाहन पोहचत नाही. अशीच स्थिती चिंचवाडी, अशेणेवाडी, सागाची वाडी, भूतिवली वाडी, बोरीची वाडी, धामण दांडा या आदिवासी वस्त्यांमध्ये पहावयास मिळत आहे. विकास राहिला दूर, निदान मूलभूत सुविधा तरी आम्हाला मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा दुर्गम भागातील रहिवासी व्यक्त करीत आहेत.

एक महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. अंत्यविधीसाठी मृतदेह चादरीच्या डोलीतून एक तासाचा रस्ता पार करून घरी न्यावा लागला. वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही. पाणी फक्त पावसाळ्यातच, उन्हाळ्यात डवरे खोदून पाणी शोधावे लागते.
-अरविंद सुतक, ग्रामस्थ, चिंचवाडी

- Advertisement -

0

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -