घरमुंबईतुमच्या काळात खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?, भाजपचा सवाल

तुमच्या काळात खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?, भाजपचा सवाल

Subscribe

आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांना एनआयए चौकशीसाठी बोलावणार आहेत. या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या चुकांचे खापर आता राज्य सरकारवर फोडले जात आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांचा या प्रकरणात थेट संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासाठी आयपीएस लॉबीत मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यावर विरोधी पक्षाने राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. विरोधी पक्षांनी केल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. परंतु भाजप आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीवर घणाघात केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटरवरुन भाजपला प्रत्युत्तरात म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत. असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडून देण्यात आले होते.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपावर भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सचिन वाझे प्रकरणावर राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणात राज्य सरकारचे मंत्री आणि काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सचिन वाझे हे मुंबई पोलीस दलातील अधिकारी होते. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करुन हेमंत नगराळे यांना नवे मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड केली आहे. वाझे प्रकरणात आणखी किती अधिकाऱ्यांची चौकशी होते याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -