घरमुंबईभाजपकडून गणेश नाईकांच्या प्रवेशाचा मेगा शो?

भाजपकडून गणेश नाईकांच्या प्रवेशाचा मेगा शो?

Subscribe

भाजपकडून नाईकांच्या प्रवेशाचा मेगा शेा होणार आहे. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. गणेश नाईक यांचे नवी मुंबईसह, ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर मीरा भाईंदर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात वर्चस्व आहे. ठाण्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यावर त्यांचा वरचष्मा होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे पूत्र आमदार संदीप नाईक आणि सागर नाईक यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र येत्या काही दिवसात गणेश नाईक हे सुध्दा प्रवेश करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील लवाजमा घेऊनच ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपकडून नाईकांच्या प्रवेशाचा मेगा शेा होणार आहे. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. गणेश नाईक यांचे नवी मुंबईसह, ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर मीरा भाईंदर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात वर्चस्व आहे. ठाण्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यावर त्यांचा वरचष्मा होता. तसेच जिल्ह्यात आगरी समाज मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नाईकांना पुन्हा जिल्ह्यावर आपली कमांड बसविता येणार आहे.

नितीन गडकरी आणि गणेश नाईक यांचे मैत्रीचे संबध

आमदारकीचा राजीनामा देऊन संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश केला. मात्र गणेश नाईकांच्या प्रवेशाचा मेगा शो ठेवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गणेश नाईक यांचे मैत्रीचे संबध आहे. युती सरकारच्या काळात गडकरी-नाईक मंत्री हेाते. त्यामुळे नाईकांच्या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांच्याबरेाबर जिल्ह्यातील अनेक मातब्बर मंडळी प्रवेश करणार असल्याचेही समजते. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नाईकांच्या गुप्तगू बैठकाही सुरू आहेत. एकिकडे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी भूईसपाट करण्याचा नाईकांचा विचार आहे. त्यादृष्टीने त्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा चेहरा लवाजमासह भाजपत दाखल होणार असल्योन त्याचा मेगा शो करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लावली – जितेंद्र आव्हाड

नाईकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम नवी मुंबई ठाणे कि मुंबई? कुठे करायचा याबाबतही विचार सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर जाेरदार टीका करीत, पक्षाला खड्ड्यात टाकण्याचे काम केल्याचा हल्ला केला आहे. आव्हाडांच्या टीकेने नाईक चांगलेच दुखावले गेले असून याचेही उत्तर देणार आहेत. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे दोनच तर उल्हासनगरात ४ नगरसेवक आहेत. त्यामुळे आजी माजी किती नगरसेवक आणि पदाधिकारी नाईकांच्या गळाला लागतात याकडं सर्वांच लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनाही नाईकांच्या टार्गेटवर असणार आहे. त्यामुळे येत्या काळात किती राजकीय समीकरण बदलतात तेच पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -