घरमनोरंजनशिव-वीणाच्या नात्यावर रंगली बिग बॉसमधील प्रेस कॉन्फरन्स

शिव-वीणाच्या नात्यावर रंगली बिग बॉसमधील प्रेस कॉन्फरन्स

Subscribe

गेले नव्वद दिवस सुरू असलेला ‘बिग बॉस’ मराठी हा रियालिटी शो आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. भांडण, शिवीगाळ असं वाजत गाजत सुरू झालेलं पर्व या ना त्या कारणामुळे सतत गाजलं. आज याच बिग बॉसच्या घरात प्रेस कॉन्फरन्स रंगली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांनाही घरातील सदस्यांनी सडेतोड उत्तर दिली.

गेले अनेक विकेंड च्या डावा ज्या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही, ती म्हणजे शिव आणि वीणा. पत्रकार परिषदेतसुद्धा शिव आणि वीणाला त्यांच्या मैत्रीवरून भंडावून सोडलं. शिव आणि वीणाने देखील दिलखुलास उत्तर दिली. “आमची मैत्री केवळ घरात नसून घरातून बाहेर पडल्यावरही तशीच राहणार आहे. घरच्यांच्या परवानगीने च आम्ही लग्न करू. टीआरपी किंवा घरात टिकून राहण्यासाठी आम्ही काहीही करत नाही, असे स्पष्टीकरण शिव आणि विणाने पत्रकारांच्याही मैत्री केवळ घरापुर्ती आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना दिले. शिव-वीणा बरोबरच आणखी एक मुद्दा प्रेस कॉन्फरन्समध्ये होता, तो म्हणजे वीणा आणि शिवानीची सतत होणारी भांडणं. यावेळी वीणाने घराच्या बाहेर पडल्यावर शिवानीचे तोंड बघणार नाही, असं सांगितलं. तर शिवानीने तिला वीणा का आवडत नाही याची नेहमीप्रमाणेच कारणं सांगितली.

- Advertisement -

सर्व सदस्य फायनल ६ मध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी असा साजरा केला आनंद –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -