घरमुंबईरेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक

Subscribe

रविवारी होणार मुंबईकरांचे मेगा हाल

उपनगरीय रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवार मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी रविवारी प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागणार आहे.त्यामुळे रविवारी रेल्वे प्रवाशांनी लोकल प्रवास करताना लोकल सेवांचे वेळापत्रक पाहूनच रेल्वे प्रवास करावा.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दिवा अप (सीएसएमटी दिशेने) जलद मार्गवर सकाळी 11.25 ते दुपारी 3.55 वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.परिणामी ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान अप जलद मार्गवरील लोकल अप धीम्या मार्गवरुन वळविण्यात येणार आहे. परिणामी उपनगरीय लोकल 15 मिनिट उशिरा धावणार आहे. तसेच हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि नेरुळ/बेलापूर-खारकोपर या अप- डाऊन मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.3

- Advertisement -

ते दुपारी 4.00 वाजेपर्यत असणार आहे. याब्लॉक दरम्यान बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गवरील लोकलसेवा बंद असणार. तसेच पनवेल – अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे- पनवेल -ठाणे या मार्गवरील लोकलबंद ठेवण्यात येणार आहे. यामार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी- वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे-वाशी /नेरुळ या मार्गावरून स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.

परेवर सुध्दा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकाच्या अप-डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.हा ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यत असणार आहे. दरम्यान ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरुन होणार. ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -