घरमुंबईमीरा भाईंदरमधील तहसीलदार कार्यालय त्रासदायक

मीरा भाईंदरमधील तहसीलदार कार्यालय त्रासदायक

Subscribe

दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची कसरत

 मीरा भाईंदर शहरातील सुरु करण्यात आलेले अपर तहसीलदार कार्यालय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असल्याने नागरीकांसह ज्येष्ठ, दिव्यांग आदींना अतिशय जाचक ठरले आहे. लिफ्ट नसल्याने दोन मजले चढून ये-जा अवघड जात आहे. तर कार्यालयाचा कारभार पूर्णपणे सुरूही करण्यात आलेला नाही.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र तहसीलदार कार्यालयाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठांना आवश्यक असलेल्या दाखल्यांकरता ठाण्याला सेतू कार्यालयात जावे लागत होते. नंतर मात्र नगरभवन येथील महसूलच्या कार्यालयात दाखल्यांची सुविधा करुन देण्यात आली. मात्र स्वतंत्र तहसीलदार कार्यालयाची मागणी पाहता विधानसभा निवडणुकी आधी शासनाने अपर तहसिलदार कार्यालयास मंजुरी दिली.

- Advertisement -

महापालिकेने कार्यालयासाठी मध्यवर्ती ठिकाणी लिफ्ट असलेली किंवा तळमजल्यावरची जागा देणे आवश्यक असताना भाईंदर पश्चिमेस 90 फुटी मार्गावर उड्डाणपुलाजवळ असलेल्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावरची महापालिकेची जागा दिली आहे. याठिकाणी कोणतीही सुविधा, दप्तर नसताना विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागायच्या आधी घाई गडबडीत या कार्यालयाचे उद्घाटन महापौर डिंपल मेहतांसह तहसीलदार अधिक पाटील, तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, अपर तहसीलदार देशमुख व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उरकण्यात आले. खरे तर कार्यालयाचे घाईगडबडीत उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्नही केला गेला.

कार्यालय दुसर्‍या मजल्यावर असून जिने उंच आहेत. लिफ्ट नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग यांना तर जीने चढून जाणे अशक्य बनले आहे. सामान्य नागरीक व अधिकारी – कर्मचार्‍यांना जिने चढून जाताना धाप लागते. त्यामुळे कामासाठी येणारे नागरिक संतापले आहेत. जिने अरुंद व दुसर्‍या मजल्यावर कार्यालयाच्या ठिकाणीचा येण्या-जाण्याचा पॅसेज अत्यंत अरुंद आहे. एखादी दुर्घटना घडल्यास कार्यालयातून बाहेर पडणे अवघड ठरणार आहे.

- Advertisement -

लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी नागरीकांना सोयी सुविधेची दुसरी जागा देण्यास महापालिकेला कळवले असल्याची माहिती अपर तहसीलदार देशमुख यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -