घरमुंबईकचरा व्यवस्थापनाचे काम आता अधिक प्रभावीपणे!

कचरा व्यवस्थापनाचे काम आता अधिक प्रभावीपणे!

Subscribe

'आर मध्य', 'आर उत्तर' व 'आर दक्षिण' या तीन विभागांमध्ये कचरा उचलण्यापासून ते वाहून नेण्याचे कंत्राट (Turn-key Contract) देण्यात आले असून, याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही आजपासून कंत्राटदारामार्फत सुरु करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी व्हावे, यादृष्टीने महापालिका नियमितपणे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातून दररोज जमा होणा-या ९ हजार मेट्रीक टन कच-याचे प्रमाण घटून आता दररोज ७ हजार २०० मेट्रीक टनपर्यंत खाली आले आहे. कच-याचे प्रमाण कमी झाल्याने नवीन कंत्राटात कचरा वाहून नेणा-या गाड्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. तथापि, याबाबतच्या आढाव्या दरम्यान ‘इ’ विभाग, ‘एफ उत्तर’ व ‘एम पूर्व’ या तीन विभागांमध्ये कचरा संकलनासाठी अधिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने तिथे अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था आता करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘आर मध्य’, ‘आर उत्तर’ व ‘आर दक्षिण’ या तीन विभागांमध्ये कचरा उचलण्यापासून ते वाहून नेण्याचे कंत्राट (Turn-key Contract) देण्यात आले असून, याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही आजपासून कंत्राटदारामार्फत सुरु करण्यात आली आहे. यासर्व बाबींमुळे महापालिका क्षेत्रातील घनकच-याचे व्यवस्थापन आता अधिक प्रभावी होणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेचे प्रयत्न

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राच्या शहर विभागातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘जी उत्तर’ या आठ विभागांमध्ये; तर पूर्व उपनगरांमधील ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ या दोन विभागांमध्ये; अशा एकूण १० विभागांमध्ये कचरा वाहून नेणारी वाहने भाडे तत्वावर घेण्याचे ७ वर्षांसाठीचे कंत्राट १ नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे.
तसेच ‘आर दक्षिण’, ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ या तीन विभागांमध्ये कचरा उचलण्यापासून ते क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेण्यापर्यंतचे ‘टर्न की कॉन्ट्रॅक्ट’ देण्यात आले आहे. या कंत्राटाची कार्यवाही आज १३ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.
महापालिका क्षेत्रातील कच-याचे प्रमाण ९ हजार मेट्रीक टनांवरुन आता ७ हजार २०० मेट्रीक टनापर्यंत, म्हणजेच सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व विभागातील वाहनांच्या सेवा देखील १५ टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते.

- Advertisement -

कचरा गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

‘एफ उत्तर’ विभागात यापूर्वी मोठ्या कॉम्पॅक्टरच्या १६ फे-या, तर छोट्या कॉम्पॅक्टरच्या १२ फे-या होत असत. ही संख्या वाढवून आता मोठ्या कॉम्पॅक्टरच्या २० फे-या, तर छोट्या कॉम्पॅक्टरच्या १५ फे-या अशी करण्यात आली आहे.
‘एम पूर्व’ विभागात यापूर्वी मोठ्या कॉम्पॅक्टरच्या २३ फे-या, तर छोट्या कॉम्पॅक्टरच्या १६ फे-या होत असत. ही संख्या वाढवून आता मोठ्या कॉम्पॅक्टरच्या २७ फे-या, तर छोट्या कॉम्पॅक्टरच्या २० फे-या अशी करण्यात आली आहे.
‘परिमंडळ ७’ मध्ये ‘आर दक्षिण’, ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ अशा तीन विभागांचा समावेश आहे. या तिन्ही विभागांमधील घनकच-याचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने कचरा उचलण्यापासून ते कॉम्पॅक्टर वाहनाद्वारे क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेणे, वाहनांवर ड्रायव्हर-क्लीनरची व्यवस्था करणे, सोसायट्यांमधील कचरा जमा करण्यासाठी कचराकुंड्या सोसायटी स्तरावर उपलब्ध करुन देणे, रस्त्यावरील कचराकुड्यांचे निर्मूलन करणे, कचरा उचलून गाडीत टाकण्यासह इतर आवश्यक बाबींसाठी कामगारांची व्यवस्था करणे इत्यादी बाबींचा समावेश असलेले सर्वसमावेषक पद्धतीचे ‘टर्न-की कॉन्ट्रॅक्ट’ देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -