घरमुंबईशिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम

शिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम

Subscribe

मुंबई महापालिका शाळांचे शिक्षक विविध प्रशिक्षणात अडकून पडलेले असतात. शिक्षक प्रशिक्षणाला गेल्याने, वर्गात शिकवायला शिक्षक नसल्याने, मुलांचे शिक्षणाचे मोठे नुकसान होते. आज कोणत्याही खासगी शाळांचे शिक्षक काही प्रशिक्षणाला जात नाहीत. तरीही त्या शाळांचा दर्जा चांगला राहातो. पण महापालिकेचे शिक्षक प्रशिक्षण घेऊनही शिक्षणाचा दर्जा चांगल्या प्रकारे राखला जात नाही. त्यामुळे महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान न होता प्रशिक्षणाचे वेळापत्रक बनवले गेले पाहिजे आणि प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत दिले जावे, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नेहल शहा यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे केली.

महापालिका शिक्षण विभागाचे अर्थसंकल्पीय भाषण करताना नेहल शहा यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महापालिका शिक्षण विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्याचीही मागणी केली. या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

- Advertisement -

प्लास्टिक बॉटल्स, डब्यावर बंदी

मुंबईत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदी जाहीर केली. परंतु महापालिका शाळांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत तेवढी प्रभावीपणे जागरुकता नाही. आजही महापालिका शाळांमधील मुलांना प्लास्टिक खाऊचे डबे आणि पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्लास्टिक डबे आणि बॉटल्सवर बंदी आणून त्याऐवजी मुलांना स्टिलचे डबे आणि बॉटल्स दिल्या गेल्या पाहिजेत, अशी सूचना त्यांनी दिली. तसेच मुंबईतील अनुदानापासून वंचित असलेल्या ६२ शाळांचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -