घरमुंबईअमित चंदोले यांना ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

अमित चंदोले यांना ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Subscribe

टॉप सिक्युरिटी ग्रुपचे प्रमोटेर अमित चंदोले यांच्या बाबतीतला विशषे पीएमएल न्यायालयाचा निकाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला. मनी लॉंड्रिंग प्रकरणात अमित चंदोले यांना अंमलबजावणी संचलनालय (इडी) ची कस्टडी नाकारल्याचा निकाल विशेष पीएमएल कोर्टाने दिला होता. या प्रकरणात पुन्हा एकदा नवीन आदेश देत विशेष न्यायालयाने आजच ही प्रक्रिया पुर्ण करावी, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याआधी इडीने चंदोले यांना एका खाजगी सुरक्षा कंपनीत टॉप्स सिक्युरीटीमध्ये अवैधरीत्या पैसे गोळा केल्या प्रकरणात अटक केली आहे. अमित चंदोले हे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्रही आहेत. अमित चंदोले यांना उच्च न्यायालयाकडून ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश आज देण्यात आला.

चंदोले हे टॉप सिक्युरीटी ग्रुपचे प्रमोटर म्हणून काम करतात. याआधी इडीने १० ठिकाणी छापे टाकत मुंबई आणि ठाण्यात शोध मोहीम राबवली होती. इडीने टॉप सिक्युरीटीजचे आणखी काही प्रमोटर तसेच काही राजकीय व्यक्तींच्या घरावरही धाडी टाकल्या होत्या. इडीने याआधीच स्पष्ट केले होते की, टॉप ग्रुप आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात काही सबळ पुरावे सापडले आहेत. त्यामुळेच या व्यवहारांची चौकशी इडीमार्फत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

चंदोले यांना ९ डिसेंबरपर्यंत ट्रायल कोर्टाने न्यायायलयीन कोठडी सुनावली आहे. या कोठडीच्या कालावधीमध्ये व्यवहार झालेल्या पैशाचा वापर कशा पद्धतीने झाला याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. टॉप्स ग्रुपच्या प्रकरणात २०१४ साली काही कंत्राटे दिली होती. त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतच इडीमार्फत चौकशी करण्यात येत होती.


 

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -