घरमुंबईग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार

Subscribe

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ७ डिसेंबरला रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर सार्‍या जगाला दाखवून दिले, याबद्दल आम्हाला रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सत्कार समारंभात काढले. जिल्हा परिषदेच्या अनेक शााळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना रणजितसिंह डिसले यांनी यावेळी व्यक्त केली. या सत्कार समारंभात शिक्षक आमदार कपिल पाटील व विक्रम काळे व शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -