घरमुंबईविक्रोळी येथे अपघातात भावाचा मृत्यू; बहिण गंभीर जखमी

विक्रोळी येथे अपघातात भावाचा मृत्यू; बहिण गंभीर जखमी

Subscribe

विक्रोळी येथे अपघाताच्या एका घटनेत प्रतिक सुरेंद्र लोंढे या 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची बहिण प्रणाली सुरेंद्र लोढे ही गंभीररीत्या जखमी झाली. प्रणालीवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी प्रतिकविरुद्ध निष्काळर्जीपणाने बाईक चालवून स्वत:च्या मृत्यूस तसेच बहिणीच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेसात वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील ऐरोली उड्डानपुलाजवळील पोल क्रमांक एफव्हायबीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोंढे कुटुंबिय गोवंडीतील गौतमनगर, झेंडे गाड्रनजवळील परिसरात राहतात. गुरुवारी सकाळी प्रतिक हा त्याची 20 वर्षांची बहिण प्रणालीसोबत भायखळा येथून घराच्या दिशेने जात होता. प्रतिक हा भरवेगात बाईक चालवत होता. ही बाईक पूर्व दुतग्रती महामार्गावरुन जात असताना अचानक प्रतिकचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईकने फुटपाथच्याकडेला धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी या दोघांनाही पोलिसांनी विक्रोळीतील फोर्टीज रुग्णालयात दाखल केले होते. तिथे प्रतिकला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर प्रणालीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. ती अद्याप बेशुद्धावस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात प्रतिकच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -