घरमुंबईपालघरमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ

पालघरमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ

Subscribe

शेजारी राहून दागिन्यांची लूट

वसई:-शेजार्‍यांचा विश्वास संपादन करून त्यांचे दागिने चोरून फरार होणारे एक दाम्पत्य पालघर जिल्ह्यात सक्रिय झाले असून या बंटी-बबलीने धुमाकूळ घातला आहे. त्यांनी गोडीगुलाबीचे नाटक करून अनेकांना लुबाडले आहे, त्यामुळे नागिरकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसानी केले आहे.

नवनीत नाईक आणि स्मिता नाईक असे या दाम्पत्याचे नाव आहे. एखाद्या इमारतीत ते भाडोत्री म्हणून वास्तव्याला राहतात. त्यानंतर शेजार्‍यांशी घरोबा करून त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यांच्या घराची संपूर्ण माहिती घेतात आणि संधी साधून त्यांच्या घरातील दागदागिने, सोने-नाणे चोरी करून पसार होतात, अशी त्यांची चोरी करण्याची पद्धत आहे. सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे चोरी केली होती. त्यानंतर ते फरार झाले आहेत. याप्रकरणी 380, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे नाईक दाम्पत्य अकरा महिन्यांसाठी एखाद्या इमारतीत अथवा चाळीत भाड्याने घर घेऊन राहते. त्यानंतर आसपासच्या लोकांशी मिळून-मिसळून चांगुलपणाने वागतात. त्याचवेळी एखाद्या कुटुंबाची माहिती घेवून, त्यांच्याशी घरोबा करतात. मग संधी साधून त्यांच्या घरातील दागिने घेवून पोबारा करतात.त्यामुळे नागरिकांनी या दाम्पत्यापासून सावध रहावे. त्यांची कोणतीही माहिती मिळाली तर सफाळे पोलीस ठाणे -08669604037 अथवा-08805008000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -