घरमुंबईटिळकनगर आग प्रकरण; 'यांनी' दिले २५ जणांना जीवनदान

टिळकनगर आग प्रकरण; ‘यांनी’ दिले २५ जणांना जीवनदान

Subscribe

सोमय्या महाविद्यालयात शिकणारा सौरभ लंके, व्यावसायिक सुधाकर शेट्टी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत काम करणारे अविनाश भाट या तिघांना पुस्तक देऊन त्यांचे विनोद तावडे यांनी कौतुक केले.

चेंबूर येथील सरगम सोसासायटीमध्ये लागलेल्या आगीमध्ये ५ जणांचा नाहक बळी गेला. या आगीमधून अनेक जणांची सुटका काही तरुणांनी केली या तरुणांच्या धैर्याचे कौतुक शिक्षणमंत्री आणि उपनगर जिल्हा पालकमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. आपल्या जीवाची, कुटूंबाची पर्वा न करता आगीत अडकलेले कुटुंब आपलेच कुटुंब आहे, अशा भावना मनात आणून सौरभ लंके, सुधाकर शेट्टी आणि अविनाश भाट यांनी २५ जणांचे प्राण वाचवले. त्यांचे धैर्य आणि कर्तृत्व असामान्य असल्याचे उद्गार विनोद तावडे यांनी काढले.


हेही वाचा  टिळकनगर आग प्रकरण: बिल्डरसह २ जणांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

२५ जणांचे वाचवले प्राण

सरगम सोसायटीमधील आगीच्या दुर्घटनेतील रहिवाश्यांनी आज विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी सरगम सोसायटीमधील अन्य रहिवाशी सुध्दा उपस्थित होते. सोमय्या महाविद्यालयात शिकणारा सौरभ लंके, व्यावसायिक सुधाकर शेट्टी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत काम करणारे अविनाश भाट या तिघांना पुस्तक देऊन त्यांचे विनोद तावडे यांनी कौतुक केले. या तिघांनी दाखविलेल्या धैर्यामुळे अनेक रहिवाश्यांचे प्राण वाचले.


हेही वाचा – टिळकनगर इमारत आग प्रकरण; ५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

प्रकरणाची चौकशी होणार

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण तिघांच्या धैर्यामुळे आणि बचाव कार्यात अग्रेसर असल्याने अनेक रहिवाश्यांच्या प्रयत्नामुळे अनेक रहिवाश्यांचे प्राण वाचू शकले. ही दुर्घटना कशी घडली, कोणाच्या चुकांमुळे घडली त्याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती विनोद तावडे यांनी यावेळी दिली. मात्र फक्त चुका पाहत न बसता अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण हिमतीने लोकांना वाचविण्यासाठी काय करु शकतो याचा आदर्श या तिघांनी घालून दिलेला आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले.

आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार

स्थानिक नगरसेवक सुषम सावंत यांनी मागणी केल्याप्रमाणे उपनगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री म्हणून दुर्घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल. अशा दुर्घटना होऊ नये म्हणून फायर ऑडिट ही जी कल्पना आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होऊ शकतो, पण अशी दुर्घटना आपल्या येथे होऊ नये म्हणून फायर ऑडिट करणे, अतिशय महत्वाचे आहे आणि ते करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असेही तावडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -