घरमुंबईऑनलाईन औषध विक्रीविरोधात एफडीएवर मोर्चा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात एफडीएवर मोर्चा

Subscribe

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिटच्या संघटनांनी एफडीआयच्या वांद्रे कार्यालयावर मोर्चा काढला. जवळपास ५०० केमिस्ट मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केमिस्ट यांच्या पोटावर पाय येत असल्याचे या केमिस्ट संघटनेचे म्हणणे आहे.

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात मुंबई, ठाणे आणि कळव्यातील केमिटच्या संघटनांनी सोमवारी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या वांद्रे कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्यांवर एफडीए कुठल्याच प्रकारची कडक कारवाई करत नसल्याचा केमिस्ट संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरातील केमिस्ट सोमवारी एफडीएवर धडकले.

५०० केमिस्ट उतरले रस्त्यावर

ऑनलाईन औषध विक्रीमुळे जे केमिस्ट आहेत त्यांच्या पोटावर पाय येत असल्याचे या केमिस्ट संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय ऑनलाईन औषध विक्रेत्यांकडे कायदेशीर पात्रता नसते. त्यामुळे एकूणच रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या अनेक मागण्यांसाठी आक्रमक झालेले ५०० केमिस्ट रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत होते. ऑनलाईन फार्मसी आम्हाला स्विकार नाही ,असे म्हणत केमिस्ट संघटनांकडून जोरदार निषेध करण्यात आला.

ऑनलाईन फार्मसीला परवानगी नसतानाही सर्रास औषध विक्री सुरू आहे. ऑनलाईन फार्मसीमुळे एका क्लिकवर औषध उपलब्ध झाल्यामुळे तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊ शकते, अशी भीती औषध विक्रेत्यांनी ‘माय महानगर’ शी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -

लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

ऑनलाईन फार्मसीमुळे महाराष्ट्रातील जवळपास आठ लाख औषध विक्रेते आणि ४० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगली तलवार आहे. अशा ऑनलाईन फार्मसीमुळे आमच्या पोटावर पाय येऊ शकतो, अशी भीतीही कळवा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

ऑनलाईन औषध विक्रीचे गैरफायदे

गर्भनिरोधक गोळ्या आणि झोपेच्या गोळ्या सर्रास ऑनलाईन उपलब्ध होतात.

- Advertisement -

त्यांच्या जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जातात. त्यातूनही अनेकदा खरेदी केली जाते.

औषधांचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य आहे किंवा नाही हे पाहता येत नाही.

कुठल्याही पद्धतीच्या प्रिस्क्रिपशन शिवाय ही औषधे विकली जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -