घरमुंबईरेशनवर चिकन, मटण?

रेशनवर चिकन, मटण?

Subscribe

केंद्र सरकारकडून विचार सुरू

नागरिकांना पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून रेशन दुकानावर स्वस्त दरामध्ये चिकन, मटन आणि अंडी देण्यावर केंद्र सरकारकडून विचार सुरू आहे. परंतु फक्त गहू, तांदूळच रेशन दुकानावर मिळत असताना त्यासाठीही नागरिकांना प्रत्येक महिन्याला वारंवार खेटे मारावे लागतात. असे असताना चिकन, मटन व अंडी तरी वेळेत मिळतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रेशन दुकानावर गहू, तांदुळ, कडधान्ये, साखर व तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. अन्नधान्य अनुदानापोटी सरकारला मोठी तरतुद करावी लागते. असे असले तरी प्रत्यक्षात गहू, तांदुळ वगळता एकही धान्य रेशन दुकानावर सवलतीच्या दरात मिळत नाही. सवलतीच्या दरात मिळणार्‍या गहू, तांदळासाठीही नागरिकांना रेशन दुकानावर वारंवार फेर्‍या माराव्या लागतात. असे असताना आता रेशन दुकानावर पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार करत आहे. यामध्ये मटण, चिकन, अंडी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सुरवातीच्या टप्प्यात किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील, अशी माहिती मिळत आहे. याबाबत नीती आयोगाकडून योजना तयार करण्यात येत आहे. याबाबत बोलताना एका अधिकार्‍याने सांगितले की, रेशन दुकानांमध्ये मिळणार्‍या वस्तूंची यादी व्यापक करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. याची सुरुवात किमान एक किंवा दोन प्रोटीनयुक्त खाद्यवस्तूंनी होईल. यात मटण, चिकन आणि अंडीचाही समावेश असेल.

देशात कुपोषण आणि अ‍ॅनिमियासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाकडून विचार सुरु आहे. पुढील 15 वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवले जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट 1 एप्रिल 2020 पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -