घरमुंबईलाईफ लाईनच ठरतेय डेथ लाईन

लाईफ लाईनच ठरतेय डेथ लाईन

Subscribe

लोकलमधून पडून 94 जणांचा बळी, जीवघेणा प्रवास कधी थांबणार ? , प्रवाशांचा रेल्वे प्रशासनाला सवाल

वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून चार्मी पासड या तरुणीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलमधील जीवघेणा प्रवास समेार आला आहे. १ जानेवारी पासून १६ डिसेंबर २०१९ या काळात डोंबिवलीत लोकलमधून पडून आतापर्यंत 94 प्रवाशांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे सेवा आता डेथ लाईन ठरू लागली आहे कि काय ? असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे. ठाण्यापासून पुढे उपनगरीय मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच त्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळे हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार ? अजून किती जणांचे बळी घेणार ? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जात आहे.

प्रवाशांनी खच्चून भरून येणार्‍या लोकल त्या गर्दीतून डब्ब्यात शिरताना करावा लागणारा संघर्ष ही बाब प्रवाशांसाठी नवी नसली तरी मुंबईतील प्रवास आता मात्र जीवघेणा ठरत आहे. वाढत्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून जीव गमाविणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

- Advertisement -

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 150 प्रवाशांचे बळी गेले आहेत. त्यात लोकलमधून पडून 94 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 85 पुरुष तर 9 महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसेच बर्‍याचदा शॉर्टकटच्या नादात प्रवासी रूळ ओलांडतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना 44 प्रवासी जखमी झाले आहेत. तर कल्याण लोहमार्ग हद्दीत 205 प्रवाशांचे बळी गेले आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसई, जुचंद्र, कोपर, भिवंडी, बापगाव, कामण, डोंबिवली ठाकुर्ली व अप्पर कोपर अशी रेल्वे स्थानके आहेत. मात्र या ठिकाणी रुग्णवाहिकाच नाहीत. पोलिसांना सुविधा मिळत नसल्याने ट्रॅकवरील जखमी प्रवाशाला आणण्यासाठी स्ट्रेचर, रुग्णवाहिका, हमाल आदींची तात्काळ सोय मिळत नाही.

परिणामी उपचार मिळण्यात विलंब होत असल्याने अनेकवेळा प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. उशिरा येणार्‍या लोकल, वाढती गर्दी यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरूनच लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. लोकल आली की ट्रेनमध्ये चढण्यासाठी महिलांची धावपळ होते. एखादी ट्रेन काही मिनिटे उशिरा आली तरी प्रचंड गर्दीचा सामना करीतच प्रवास करावा लागतो. ठाण्यापासून पुढे उपनगरीय मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच त्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना कमी पडत आहेत.

- Advertisement -

दिवा-मुंब्रा-कळवा स्थानकात दररोज सहा ते सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. कर्जत, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण येथून खच्चून भरून लोकल येतात. प्रवाशांना डब्यात शिरणेही मुश्किल असते. अशावेळी प्रवाशांना लटकतच जावे लागते. दिवसेंदिवस गर्दीने हाऊसफुल्ल भरलेल्या लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावे लागत आहेत. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याऐवजी रेल्वे प्रशासन मात्र या अपघातांना प्रवाशांनाच जबाबदार धरत आहे. प्रवाशांच्या अती घाईमुळे अपघात होतात. असे म्हणत प्रत्येक वेळी रेल्वे प्रशासन हात वर करते. मुळात मध्य मार्गावर कधीच गाड्या वेळेवर नसतात. सततचा यांत्रिक बिघाड, पेंटाग्राफ तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड, रुळावरुन गाडी घसरणे, क्रॉसिंग या कारणाने गाड्यांना विलंब होतो. त्यामुळे आधीच चाकरमानी कमालीचे त्रासलेले असतात. लेटमार्क लागू नये यासाठी वेळेत कामावर पोहचण्यासाठी धक्के खात, लोंबकळत प्रवास करावा लागतो. याकडे मात्र रेल्वे का लक्ष देत नाही. असा संताप प्रवाशांचा आहे.

उल्हासनगरजवळ तरुण तर विठ्ठलवाडीजवळ महिला लोकलमधून पडली

डोंबिवली दिवा दरम्यान लोकलमधून पडून चार्मी पासड या 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी उल्हासनगर रेल्वे स्थानकानजीक लोकलमधून पडून एक तरूण जखमी झाल्याची घटना घडली. दिनेश गायकवाड असे त्या तरुणाचे नाव आहे. लोकल उल्हासनगर स्थानकात शिरत असतानाच दिनेशचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एक महिला जखमी झाली आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्या महिलेचे नाव समजू शकले नसून तिला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान लोकलमधून पडून जखमी तसेच मृत होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -