घरमुंबई'कळव्यातील चौपाटीला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव द्यावे'

‘कळव्यातील चौपाटीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव द्यावे’

Subscribe

'मराठा सेवा संघा'तर्फे नामकरणासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

कळवा नाका येथील नवीन उड्डाणपुलाचे काम करीत असताना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. सदर पुतळा खारेगाव रेतीबंदर येथील चौपाटीच्या मध्यभागी प्रतिष्ठापन करून या चौपाटीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर निवेदन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नवीन पूलाच्या बांधकामामुळे पुतळ्याकडे दुर्लक्ष

कळवा पूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे लोकार्पण तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. अल्पावधीत महाराजांच्या पुतळ्यामुळे सदर परिसराला वेगळे महत्व प्राप्त झाले. मात्र सदर परिसरात नवीन पूलाच्या बांधकामामुळे सदर पुतळा दुर्लक्षित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा पुतळा नवीन पूलाच्या कामामुळे पूर्णपणे झाकला गेला आहे. तरी सदर पुतळा खारीगाव येथील महापालिकेच्या मार्फत चौपाटी सुशोभिकरणाचे काम चालू आहे. त्या चौपाटीला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौपाटी’ असे नामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार स्फूर्तिदायक

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत. त्यांनी प्रथम स्वराज्याचे आरमार उभारले. समुद्रावर देखील अधिराज्य गाजविण्याचे विचार मांडले होते. असे आधुनिक विज्ञानवादी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे येणाऱ्या पिढीस स्फूर्तिदायक ठरू शकतील, असे मत मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी मांडले.

हेही वाचा – डुंगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या भारती भगत यांची निवड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -