घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये 'हाय अर्लट'; पाकिस्तानकडून हल्ल्याचा इशारा

जम्मू काश्मीरमध्ये ‘हाय अर्लट’; पाकिस्तानकडून हल्ल्याचा इशारा

Subscribe

भारताने जम्मू-काश्मीरसंबंधीत३७० कलम हद्दपार करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून या निर्णयानंतर पाकिस्तानकडून हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारताने जम्मूकाश्मीरसंबंधीत३७० कलम हद्दपार करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून या निर्णयानंतर पाकिस्तानवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाकिस्तानचा तिळपापड होत असून जम्मूकाश्मीर निर्णयानंतर पाकिस्ताने अनेक वेगवेगळे निर्णय घेतले असून अनेक गोष्टींवर बंदी देखील आणली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून काश्मीर खोऱ्यात मोठा हल्ला घडवून आणण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

- Advertisement -

सरकारच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार

पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून काश्मीर खोऱ्यात हल्ला करण्याचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी सरकारच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार असल्याचे समजताच लष्कर, हवाई दल आणि जम्मू काश्मीरमधील सर्व सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाकिस्तानी सरकारच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार असल्याचे समोर आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी पाकिस्तान युद्धाला तयार असल्याचे देखील सांगितले होते.


हेही वाचा – कलम ३७० : जम्मू काश्मीरमधील शाळा-कॉलेज सोमवारपासून उघडणार

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -