घरमुंबईस्वच्छ भारत सर्वेक्षणात अंबरनाथ नगरपालिका राज्यात पाचवी

स्वच्छ भारत सर्वेक्षणात अंबरनाथ नगरपालिका राज्यात पाचवी

Subscribe

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये अंबरनाथ पालिकेने स्वच्छतेसाठी राबविलेल्या यशस्वी उपक्रमामुळे शहराला स्वच्छ शहरांच्या यादीत मान मिळाला. शहरातील स्वच्छतेचे सर्व्हेक्षण करून मान देण्यात आला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेने स्वच्छतेच्या उपक्रमात चांगली कामगिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये अंबरनाथ पालिकेने स्वच्छतेसाठी राबविलेल्या यशस्वी उपक्रमामुळे शहराला स्वच्छ शहरांच्या यादीत मान मिळाला. गेल्यावर्षी अंबरनाथ पालिका ही स्वच्छ सव्र्हेक्षणात देशात ६७ व्या क्रमांकावर होती. यंदा मात्र अंबरनाथ पालिकेने स्वच्छतेसाठी राबविलेल्या उपक्रमामुळे ही पालिका देशात तिसाव्या स्थानी आली आहे. राज्यात अंबरनाथ शहर हे पाचव्या स्थानी राहीली आहे. राज्यातील पालिका क्षेत्रात पहिली आली आहे. राज्यातील जे पाच शहरे आहेत त्यातील चारही शहरे ही महापालिकेत आहेत. नगरपरिषद असलेले अंबरनाथ शहर हे पाचव्या क्रमांकावर राहिले आहे. राज्यातील नगरपरिषद क्षेत्रपैकी अंबरनाथ पालिका ही पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. या आधी देखील देविदास पवार यांनी स्वच्छ सव्र्हेक्षणासाठी यशस्वी काम केले होते. त्यामुळेच पालिकेला या स्वच्छ सव्र्हेक्षणात अग्रकमांकावर राहण्याचा मान मिळाला आहे.

या कामांमुळे मिळाला मान

शहरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्रभागातच कचऱ्यावर प्रक्रिया करुन, खत निर्मिती करणे, कचऱ्यावरील आगीवर नियंत्रण मिळविणे, शैचालयांची स्वच्छता या सर्व स्थरावर पालिकेने जबाबदारीने काम केले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी पालिकेने स्वतंत्र कक्ष निर्माण केले होते. मोठी यंत्रणा या कामावर नियंत्रण करित होती. या मोहिमेसाठी अनेकवेळा बैठकांचे सत्र देखील झाले आहेत. कामचुकारपणा करणाऱ्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. या सर्वाचा परिणाम म्हणून अंबरनाथ पालिकेला हा बहुमान मिळाला आहे.

- Advertisement -

पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेसाठी मेहनत घेतली, लोकप्रतिनिधींनी प्रभागात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले, तसेच ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करताना नागरिकांचेही योग्य सहकार्य मिळाल्याने यावर्षी अंबरनाथ नगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक आला असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -