घरमुंबईतेलांमधील ट्रान्सफॅट्स कमी करण्यासाठी एफएसएसएआयचा पुढाकार

तेलांमधील ट्रान्सफॅट्स कमी करण्यासाठी एफएसएसएआयचा पुढाकार

Subscribe

२०२३ पर्यंत औद्योगिक स्तरावर ट्रान्स फॅटी अॅसिड्सचे (ट्रान्सफॅट्स) उत्पादन जगभरातून नाहिसे व्हावे, असे आवाहन जागतिक आरोग्य परिषदेने केले आहे.

भारतीयांचा आहार आणि आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एफएसएसएआय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड्स नियम २०११मध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तेल आणि स्निग्ध पदार्थांमधील ट्रान्स फॅटी अॅसिडचे प्रमाण २०२१ सालापर्यंत दोन टक्क्यांहून जास्त नसावे आणि जानेवारी २०२२ पर्यंत २ टक्क्यांपर्यंत मर्यादित असावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

ट्रान्स फॅटी अॅसिड्सचे उत्पादन नाहिसे 

नागरी समाजाच्या अनेक प्रतिनिधींनी तसेच ग्राहक हक्क चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी धोरणातील या सुधारणेच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. २०२३ पर्यंत औद्योगिक स्तरावर ट्रान्स फॅटी अॅसिड्सचे (ट्रान्सफॅट्स) उत्पादन जगभरातून नाहिसे व्हावे, असे आवाहन जागतिक आरोग्य परिषदेने केले आहे. अधिक सुरक्षित आणि अधिक सकस अन्नसाखळी निर्माण करण्यासाठी एफएसएसएआय कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

याविषयी दिशा फाउंडेशनच्या संचालक डॉ. अंजली बोर्हाडे यांनी सांगितलं की, ” २०२३ पर्यंत अन्नपदार्थांतील ट्रान्सफॅट्सचे प्रमाण शून्यावर आणलं जावं यावं डब्‍ल्‍यूएचओ प्रयत्नशील आहे. सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांमधील ट्रान्सफॅटचे प्रमाण २% पुरतेच मर्यादित राहील याची काळजी घेणारी धोरणे आदर्श मानली गेली आहेत. भारतात सध्या लागू असलेल्या नियमनांमध्ये सर्व खाद्यपदार्थांवर नव्हे तर केवळ तेल आणि स्निग्ध पदार्थांमधील ट्रान्सफॅट्सच्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -