घरमुंबईअंतिम वर्ष परीक्षा पद्धतीत गोंधळ - प्राध्यापकांची टीका 

अंतिम वर्ष परीक्षा पद्धतीत गोंधळ – प्राध्यापकांची टीका 

Subscribe

काही कॉलेजानी विद्यार्थ्यांना मोजकेच प्रश्न दिले असून तेच परीक्षेला येणार असल्याचे सांगितले आहे, तर काहींनी नियमानुसार प्रश्नसंच दिले आहेत. परिणामी विशिष्ठ कॉलेजचा निकाल चांगला लागू शकतो आणि नियमांचे पालन करणाऱ्या कॉलेजचा निकालावर परिणामही होऊ शकतो.

मुंबई विद्यापीठाने कॉलेज स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नसंच देण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्या आहेत. मात्र काही कॉलेजानी विद्यार्थ्यांना मोजकेच प्रश्न दिले असून तेच परीक्षेला येणार असल्याचे सांगितले आहे, तर काहींनी नियमानुसार प्रश्नसंच दिले आहेत. परिणामी विशिष्ठ कॉलेजचा निकाल चांगला लागू शकतो आणि नियमांचे पालन करणाऱ्या कॉलेजचा निकालावर परिणामही होऊ शकतो. या असमानतेचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता काही प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी व्यक्त केली आहे. 

विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंतिम वर्षांची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ५० गुणांची होणार असून यात प्रत्येक दोन गुणांचे २५ प्रश्न देण्यात येणार आहे. विद्यापीठाने कॉलेजांना विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच देण्याचे सुचित केले आहे. यानुसार कॉलेजांनी प्रश्नसंच देण्यास सुरुवात केली आहे. काही कॉलेजांनी फक्त २५ प्रश्नांचा प्रश्नसंच केला आहे. तीच प्रश्नपत्रिका म्हणून द्यायचे ठरवल्याचे समजते आहे. काही कॉलेजांनी नियमांनुसार १०० पेक्षा जास्त प्रश्नांचा संच करून विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच या व्यतिरिक्तचे प्रश्नही असू शकतील असेही विद्यार्थ्यांना सांगितले आहे. यात कोणतीही समानता नसल्याने हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते असे मत प्राध्यापकांनी नोंदविले आहे. २५ प्रश्नांचा प्रश्नसंच मिळणारे विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकतील तर दुसरीकडे १५० प्रश्नांचा प्रश्नसंच देणाऱ्या कॉलेजांतील  विद्यार्थी स्पर्धेत राहून कमी गुण मिळतील यामुळे यात समानता आणण्याची गरज प्राध्यापकांनी बोलून दाखवली आहे. 

अन्य विद्यापीठांमध्ये समानता

  परीक्षा घेण्याच्या तांत्रिक पद्धतीमध्येही तफावत असल्याने तेथेही समानतेचा अभाव येऊ शकणार आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनी सर्व कॉलेजांना एकाच प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. यामुळे त्यात समानता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रश्नसंच आणि प्रश्नपत्रिकेबाबत विद्यापीठाने अधिक स्पष्टता आणवी तसेच यावर कडक नजर ठेवावी अशी मागणी प्राध्यापकांकडून होत आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -