घरमुंबईप्रवीण छेडा पुन्हा भाजपात, सोमय्यांची डोकेदुखी वाढली

प्रवीण छेडा पुन्हा भाजपात, सोमय्यांची डोकेदुखी वाढली

Subscribe

प्रवीण छेडा हे याआधी भाजपामध्ये होते. मात्र प्रकाश मेहता आणि त्यांच्यातील अंतगत वादामुळे ते काँग्रेसमध्ये गेले होते. आज पुन्हा एकदा ते स्वगृही परत येणार आहेत.

सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आयारामांचे प्रमाण वाढले असून, आज काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते गरवारे क्लब येथे आपल्या हातात कमळ घेणार आहेत. प्रवीण छेडा हे याआधी भाजपामध्ये होते. मात्र प्रकाश मेहता आणि त्यांच्यातील अंतगत वादामुळे ते काँग्रेसमध्ये गेले होते. आज पुन्हा एकदा ते स्वगृही परत येणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत प्रवीण छेडा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिलेले प्रवीण छेडा पराभूत झाले होते. सर्वात भाजपच्या पराग शाह यांनी छेडा यांचा पराभव केला होता. तसेच प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

- Advertisement -

सोमय्याची डोकेदुखी वाढली

दरम्यान, प्रवीण छेडा यांच्या येण्याने खासदार किरीट सोमय्या यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात असून, शिवसेनेचा किरीट सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भाजपने काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र त्यात ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित केला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -