घरदेश-विदेशकर्नाटकाच्या विजापूरमध्ये भीषण अपघात; ९ जण ठार

कर्नाटकाच्या विजापूरमध्ये भीषण अपघात; ९ जण ठार

Subscribe

कर्नाटकामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोव्याहून कर्नाटकाकडे परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये ९ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगीजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कंटेनर आणि क्रुझरची समोरा समोर जोरदार धडक झाली. पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात क्रुझ गाडीमधील ९ जण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे तरुण २० ते ३० वयोगटातील आहेत. हे सर्व जण होळीनिमित्त पिकनिकसाठी गोव्याला गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व पर्यटक कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या अपघाताचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -