घरमुंबई'अफजल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार तर!' - काँग्रेसने उडवली खिल्ली

‘अफजल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार तर!’ – काँग्रेसने उडवली खिल्ली

Subscribe

युती झाल्यापासून ‘तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना’ अशी शिवसेना आणि भाजपाची गत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट होणार आहे. याचीच चर्चा गेले दोन दिवस चालू आहे. या भेटीत उद्धव यांचं मन वळवण्यात अमित शाह यांना यश येईल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या भेटीवर खोचक ट्विट केलं आहे.

सचिन सावंत यांचं खोचक ट्विट

अमित शाह यांना निवडणूक प्रचाराच्या भाषणादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अफझल खानाची उपमा दिली होती. नेमका हाच संदर्भ घेत सचिन सावंत यांनी बुधवारी ‘अफझल खान आणि उंदीर यांची भेट होणार तर!’ असं खोचक ट्विट केलं. सचिन सावंत यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

शिवसेना आणि भाजपाची काय असणार प्रतिक्रिया?

शिवसेना नेहमीच युती तोडण्याची भाषा करत आली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी नेहमीच शिवसेनेला स्वाभिमान जपून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. मात्र शिवसेनेने तरीही युती तोडली नाही. तसंच २०१९ ची निवडणूक ही स्वबळावर लढवण्याची भाषा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र सत्ता परत यायला हवी असेल तर युती तशीच राहणं गरजेचं आहे. त्यामुळे अंतर्गत वाद विसरून एकत्र येण्यासाठी ही चर्चा कितपत योग्य ठरेल हे येणारा काळच सांगेल. मात्र या ट्विटमुळे भाजपा आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -