घरमुंबईम्हाडा मुख्यालयातही बाहेरून येणाऱ्यांची कोरोना चाचणी! पाच जण पॉझिटिव्ह

म्हाडा मुख्यालयातही बाहेरून येणाऱ्यांची कोरोना चाचणी! पाच जण पॉझिटिव्ह

Subscribe

म्हाडा प्रशासनातर्फे वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात बाहेरून येणाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने मॉल, सिनेमागृहात प्रवेश करतेवेळी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) प्रशासनातर्फे वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात अभ्यांगतांची (बाहेरून येणाऱ्यांची) मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडा मुख्यालयात गुरुवारी (आज) आलेल्या १८२ अभ्यांगतांपैकी ५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. म्हाडा कार्यालयास दररोज सरासरी दोन हजार नागरिक भेट देतात. त्यामुळे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडास भेट देणाऱ्या अभ्यांगतांची कोरोना चाचणी करण्यास येत आहे.

वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या इमारतीत अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँक आणि न्यायालय असल्याने गृहनिर्माण भवनात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणारी भित्तीपत्रके म्हाडा मुख्यालयात, तसेच विभागीय मंडळांच्या कार्यालयात लावण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालय व म्हाडाचे राज्यातील विभागीय मंडळांमधील स्वच्छता गृहांमध्ये तथा प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोरोना चाचणीमुळे प्रवेशद्वाराजवळ होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सर्व संबंधितांनी याकामी सहकार्य करावे. म्हाडातर्फे लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत ई-मित्र कार्यप्रणाली मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. म्हाडा मुख्यालयात येणाऱ्यांची कोरोना चाचणी अपूर्व लॅब आणि जनहित डायग्नोस्टिक या लॅबोरेटोरीज यांच्यामार्फत करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना कलिना कॅम्प येथील कोरोना हेल्थ केअर सेन्टरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -