घरमुंबईशाळेच्या गणवेशावरील बॅचवरून अट्टल गुन्हेगार मोलकरणीला अटक

शाळेच्या गणवेशावरील बॅचवरून अट्टल गुन्हेगार मोलकरणीला अटक

Subscribe

व्हॉट्सअॅप डीपीवरील मोलकरणीचा पत्ता शोधून सांताक्रूझ पोलिसांनी तिला अखेर मुंबईतून अटक केली आहे.

शाळेतील गणवेशात मुलांचा फोटो व्हाट्सअॅपच्या डीपीवर ठेवणे चोरी करणाऱ्या एका मोलकरणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सअॅप डीपीवरील मोलकरणीचा पत्ता शोधून सांताक्रूझ पोलिसांनी तिला अखेर मुंबईतून अटक केली आहे. नर्मदा सोहेल खान (३४) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून तिला मदत करणाऱ्या सावित्री ठाकूर हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगर तसेच दक्षिण मुंबईत राहणाऱ्या श्रीमंताच्या घरी मोलकरणीचे काम करणाऱ्या चार महिलांच्या एका टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता. या चौघींच्या मागावर असणाऱ्या सांताक्रूझ पोलिसांनी दोन आठवड्यापूर्वी देवनार येथून वनिता गायकवाडला अटक केली होती. वनिताच्या चौकशीत नर्मदाचे नाव समोर आले. मुलुंड येथे राहणाऱ्या नर्मदाचा पोलिसांनी शोध सुरु केला असता आपल्या मागावर पोलीस असल्याचे कळताच तिने मुंबईतून थेट उत्तरप्रदेशात पळ काढला. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरात नर्मदाचे दोन मुले एका प्रतिष्टीत शाळेत शिक्षण घेतात.

- Advertisement -

नर्मदाच्या मागावर असलेल्या सांताक्रूझ पोलिसांच्या पथकाकडे नर्मदाच्या मोबाईल क्रमांक शिवाय तिला शोधण्याचे कुठलेही साधन नव्हते. अखेर पोलिसांनी तिचा मोबाईल क्रमांक व्हाट्सअॅपला आहे का हे तपासले असता तिच्या व्हाट्सअॅपच्या डिपीवर तिच्या दोन्ही मुलाचा शाळेच्या गणवेशातील फोटो होता. मुलाच्या शाळेच्या गणवेशावर असलेल्या शाळेच्या बॅचवर पोलिसांना बुलंद शहरातील शाळेचा पत्ता मिळून आला.

पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे धाव घेऊन पोलिसांनी शाळेच्या मुख्यध्यापक याची भेट घेऊन त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या नर्मदाच्या मुलाचे छायाचित्र दाखवून त्यांच्या घरचा पत्ता मिळवला. मात्र आपल्या मागावर असलेले पोलीस बुलंद शहरात पोहचल्याची कुणकुण नर्मदाला लागताच तिच्या घरी पोहचलेल्या पोलिसाना तिने चकवा देत थेट मुंबई गाठली. नर्मदाने मुंबईला पळून गेल्याचे कळताच पोलीस पथकाने मुंबईतील आपल्या दुसऱ्या पथकाला तिच्या मागावर पाठवले. अखेर नर्मदाला मुंबईत अटक करण्यात आली. तिच्या पाठोपाठ तिला गुन्ह्यात मदत करणारी सावित्री ठाकूरला देखील गुरुवारी अटक करण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत सांताक्रूझ पोलिसांनी वनिता, नर्मदा आणि सावित्री या तिघींचे अटक केली असून त्याची चौथी सहकारी भारती शिंदेला पवई पोलिसांनी अटक केली आहे. या चौघीची ओळख तुरुंगात झाली होती आणि तेथून त्यांनी टोळी तयार करून मुंबईत श्रीमंतांच्या घरी घरकाम मिळवून घरातील मौल्यवान दागिने पैसे चोरी करीत होत्या. महत्वाचे म्हणजे या चौघी ज्या ठिकाणी काम करीत असे त्या ठिकाणचे त्यांच्या मालकांनी त्यांची व्यक्तिगत माहिती न मिळवता त्यांना नोकरीवर ठेवत होते. त्याचा फायदा उचलत या चौघी चोऱ्या करून पळ काढत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चोंघीवर मुंबईत ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -