घरमुंबईसायरस मिस्त्रींकडून नवीन व्हेंचर्सची घोषणा

सायरस मिस्त्रींकडून नवीन व्हेंचर्सची घोषणा

Subscribe

सायरस मिस्त्री यांनी नवीन व्हेंचर्सची घोषणा केली आहे. नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली असल्याचे सायरस यांनी सांगितले.

सायरस मिस्त्री यांनी मिस्त्री व्हेंचर्स एलएलपीच्या स्थापनेची घोषणा केली आहे. याचा उद्देश हा व्यवसाय, नव्याने स्थापन करणे आणि भारतातील व जगभरातील स्टार्टअप्सना सुरवातीला लागलेले भांडवल उपलब्ध करण्याचा आहे. बोस्टन कंसल्टिंग ग्रुपचे वरिष्ठ पार्टनर आणि आधीचे ग्लोबल लीडर आशिष अय्यर यांना उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी पाचारण केले.

१५० हून वर्षांचा इतिहास

मिस्त्री व्हेंचर्स फक्त कंपन्यांमध्ये गुंतवणूकी पुरती मर्यादित नसेल. ठराविक जागतिक आणि स्थानिक कल लक्षात घेऊन आणि त्यांचा उद्योग आणि कंपन्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन नवीन उद्योगांना चालना देणार आहे. मिस्त्री व्हेंचर्स एलएलपी हि शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री यांनी संयुक्तपणे प्रवर्तित केलेली संस्था आहे जी शापूरजी पालनजी या जागतिक स्तरावर उपस्थिती असलेल्या १५० वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या बहुक्षेत्रीय समूहाची प्रवर्तक आहे. समूह अभियांत्रिकी आणि बांधकाम, पायाभूत सुविधा, रियल इस्टेट, जल, वीज आणि वित्त सेवा अशा क्षेत्रात ६० हून अधिक देशात कार्यरत आहे.

- Advertisement -

सायरस मिस्त्री असे म्हणाले की “आशिष यांनी जगभरात विविध क्षेत्रातील कंपन्यांबरोबर काम केले. स्ट्रॅटर्जी, गो-टू-मार्केट, डिजिटल इनोव्हेशन अशा क्षेत्रात त्यांच्याकडे त्यांचे विशेष नैपुण्य आहे. त्यांना आमच्यामध्ये सहभागी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ध्येय हे आम्ही पाठबळ देऊ असा कोणताही उपक्रम हा सकारात्मक सामाजिक प्रभावासाहित नफा देईल हे आहे. भागीदारी करू आणि विविध क्षेत्रात गुंतवणूक करू. मिस्त्री व्हेंचर्स स्टार्टप्सना बहुमुल्य सल्ला देऊ करेल आणि नवीन उद्यमशीलता कौशल्यही देऊ करेल ज्याद्वारे त्यांना उत्पादने तपासणी, प्रमाण याबाबत योग्य प्रयोग करता येतील आणि सेवा-उत्पादने बाजारपेठेत लवकर आणता येतील”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -