घरमुंबईचोर गोविंदात सुरक्षिततेची चोरी

चोर गोविंदात सुरक्षिततेची चोरी

Subscribe

दोन दिवसावर आलेल्या गोपाळकाल्याच्या तयारीसाठी मुंबईतील गोविंदा पथकांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. कोर्टाच्या लढाईनंतर यंदा थरांचे बंधन नसल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा या उत्साहाच्या वातावरणात सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सराव शिबीरांचे म्हणजेच चोर गोविंदाचे आयोजन केले जात आहे.

दोन दिवसावर आलेल्या गोपाळकाल्याच्या तयारीसाठी मुंबईतील गोविंदा पथकांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. कोर्टाच्या लढाईनंतर यंदा थरांचे बंधन नसल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा या उत्साहाच्या वातावरणात सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सराव शिबीरांचे म्हणजेच चोर गोविंदाचे आयोजन केले जात आहे. या चोर गोविंदामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा विसर आयोजकांना आणि गोविंदा पथकांना पडलेला दिसत आहे. राजकीय पक्षांचा वरदहस्त लाभलेल्या या सराव शिबीरात सात ते आठ थरांची सलामी दिली जाते. पण सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये वाढत असलेली स्पर्धा आणि थरांच्या वाढत असलेल्या उंचीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. मात्र न्यायालयीन लढाई पार करीत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडली खरी, पण हे करताना कोर्टाकडून त्यांना सुरक्षिततेचे उपाययोजना करण्याची सक्त ताकीद दिली होती. दरम्यान, कोर्टाने उपाययोजना राबविताना गोविंदा पथकांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट वापरण्याची सूचना केली होती. सध्या मुंबईत सुरू असलेल्या चोर गोविंदात काही निवडक आयोजक वगळता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात येताना दिसत नाही. या उलट अनेक आयोजकांनी तर मॅटशिवायच सराव शिबिरे चालवली आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनंतर सराव शिबीरे आयोजित केली जातात. या शिबीरांमध्ये गोविंदांचा झालेला सराव पाहिला जातो. पण सध्या ही परिस्थिती बदलली आहे. या सराव शिबीरांमध्येही एक स्पर्धाच रंगू लागली आहे. यावेळी अनेक गोविंदा पथकांकडून सात ते आठ थरांची सलामी दिली जाते. पण हे थर रचताना सेफ्टी बेल्टशिवाय गोविंदा वर चढतात. गोविंदा पथकांकडून जितके थर लावले जात आहेत. त्यानुसार त्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक दिली जातात. गोविंदाच्या दिवशी होणारा खर्च या सराव शिबीराच्या माध्यामतून जमविण्याचा प्रयत्न पथकांचा असतो. त्यामुळे गोविंदा पथके जास्तीत जास्त या सराव शिबीरांमध्ये भाग घेत असून अनेक पथकांमध्ये बाल गोविंदाचादेखील सहभाग दिसून आला आहे. मुंबईतील अनेक सराव शिबीरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहेत. पण आयोजकांबरोबरच गोविंदा पथकांकडून देखील सुरक्षिततेचे उपाय न योजले गेल्याने पुन्हा हा मुद्दा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राजकीय पक्षांचेही दुर्लक्ष
दरम्यान, मुंबईत सध्याच्या घडीला आयोजित केले जाणार्‍या सराव शिबीरात विविध मंडळाबरोबरच राजकीय कार्यकर्त्यांकडून ही सराव शिबीरांचे आयोजन केले जात आहेत. मात्र हे आयोजन करताना फक्त रुग्णवाहिका सोडून इतर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका गोविंदा अडचणीत येईल अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे

समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व गोविंदा पथकांना आवाहन करत आहोत की, त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टींने सर्व खबरदारी घ्यावी आणि आयोजकांनीदेखील याकडे लक्ष द्यावे.
-अरुण पाटील, कार्याध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -