घरमुंबईमुंबई एअरपोर्ट आता झालं छत्रपती शिवाजी 'महाराज' आंतरराष्ट्रीय विमानतळ!

मुंबई एअरपोर्ट आता झालं छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ!

Subscribe

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश प्रभू आणि नरेंद्र मोदी यांचे ट्वीटरवरुन आभार मानले आहेत.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थात छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली होती. अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, आजपासून मुंबई एअरपोर्टचे संपूर्ण नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात आले आहे. याविषयीची अधिकृत घोषणा नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू, यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन केली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचा प्रस्ताव मान्य केल्याबद्दल, प्रभू यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. तसंच सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील लोकाची मागणी पूर्ण झाल्याचं म्हणत, त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ट्वीटवरुन याविषयी माहिती देताना फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. तसंच ही मागणी पूर्ण केल्याबद्दल सुरेश प्रभू आणि नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा : ‘महाराज’ नावासाठी शिवसैनिक झाले होते आक्रमक

 सौजन्य- ट्वीटर

हेही वाचा : नवसारीमध्ये नवीन आंतराष्ट्रीय विमानतळ!

- Advertisement -

 सौजन्य- ट्वीटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -