घरमुंबईBhiwandi Building Collapse : दुर्घटनेत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू; अद्याप १० जणांचा...

Bhiwandi Building Collapse : दुर्घटनेत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू; अद्याप १० जणांचा शोध बाकी

Subscribe

भिवंडीतील पटेल कम्पाऊंड इमारत दुर्घटनेत आज, बुधवारी सकाळी ८.२३ वाजेपर्यंत २५ जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली असल्याची माहित समोर येत आहे. तर आतापर्यंत ३५ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमी क्र. २१ ते २५ शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी असल्याने अध्यायवत करण्यात आली आहेत. तसेच आज संध्याकाळपर्यंत बचावकार्य पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप ढिगाऱ्याखालून दहा जणांचा शोध घेणे बाकी आहे.

सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची –

- Advertisement -

१) हेदर सलमानी (पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी (स्त्री/२६वर्ष)
३) मोहम्मद अली (पु/६०वर्ष)
४) शबीर खुरेशी (पु/३०वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख (स्त्री/२५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
१२) आमीर मुबिन शेख (पु/१८वर्ष)
१३) आलम अन्सारी (पु/१६वर्ष)
१४) अब्दुला शेख (पु/८वर्ष)
१५) मुस्कान शेख (स्री/१७वर्ष)
१६) नसरा शेख (स्त्री/१७वर्ष)
१७) इंब्राहिम (पु/५५वर्ष)
१८) खालिद खान (पु/४०वर्ष)
१९) शबाना शेख (स्त्री/५०वर्ष)
२०) जारीना अन्सारी (स्त्री/४५)
२१) मोबिन शेख़ (पु/४६वर्ष)
२२) सायमा इब्राहिन शेख़ (पु/१७स्त्री)
२३) आयाम इब्राहिन शेख (पु/७वर्ष)
२४) रूक्सा सलमानी (स्त्री/२०वर्ष)
२५) उक्सा सलमानी (स्त्री/४वर्ष)

आतापर्यंतच्या मृत व्यक्तींची नावे –

- Advertisement -

१) झुबेर खुरेशी (पु/३०वर्ष)
२) फायजा खुरेशी (पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी( स्री/७वर्ष)
४) बब्बू (पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८वर्ष)
११) नाजो अन्सारी (स्त्री/२६)
१२) सनी मुल्ला शेख (पु/७५)
१३) अस्लम अन्सारी (पु/३०)
१४) नजमा मुराद अन्सारी (स्त्री/५२वर्ष)
१५) अफसाना अन्सारी (स्त्री/१५वर्ष)
१६) अमान ईब्राहिम शेख (पु/२२वर्ष)
१७) शाहिद अब्दुला खान (स्त्री/३२वर्ष)
१८) असद शाहिद खान ( पु/२.५वर्ष)
१९) नरीमा अरीफ शेख (स्त्री/२५वर्ष)
२०) आरीफ युसुफ शेख (पु/३०वर्ष)
२१) निधा आरिफ़ शेख़। (स्त्री/१०वर्ष)
२२) शबनम मोहम्मद आलीशेख़ (स्त्री/८वर्ष)
२३) सोएफ युसुफ़ शेख (पु/२२वर्ष)
२४) साक़िर आली अन्सारी (पु/३२वर्ष)
२५) हासनेल शेख. (पु/३वर्ष)
२६) अन्सारी मुदस्सीर मोहम्मद हनिफ (पु/२५वर्ष)
२७) फरिदा मुर्तिजा खान (स्त्री/३२वर्ष)
२८) आरीफा उर्फ उंडो मुर्तिजा खान (स्त्री/०३वर्ष)
२९) अनोळखी (पु/०६वर्ष)
३०) अनोळखी (पु/२.५वर्ष)
३१) अनोळखी (पु/४५वर्ष)
३२) मोमीना समिउल्ला शेख (स्त्री/६७वर्षे)
३३) परवीन शब्बीर कुरेशी (स्त्री/२७वर्षे)
३४) मरीयम शब्बीर कुरेशी (स्त्री/४वर्षे)
३५) फरीदा बानो मुर्तुजा खान (स्त्री/३२वर्ष)


भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात रविवारी मध्यरात्री तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून आज, बुधवार सकाळपर्यंत येथील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचला आहे. याबाबतची माहिती एनडीआरएफ टीमने दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य अद्यापही सुरू असून ढिगाऱ्याखालील शोध मोहिम सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात या बिल्डिंगचे मालक सय्यद अहमद जीलानी याच्याविरुद्ध भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकारी यांच्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३३७, ३३८. ३०४ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

एनडीआरएफ, टिडीआरएफ, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनच्या तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करीत असून कालपासून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने येथील तळ अधिक पहिल्या मजल्याचा ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले. दरम्यान, या इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाखांची मदत जाहीर केली होती. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इमारत अधिकृत असल्याबाबतची पडताळणी करून राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून अधिक ४ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा –

सिव्हिलचे कोविड सेंटर सुरु; पण टेस्ट, टीव्ही सारं काही बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -