घरताज्या घडामोडीDELHI : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता मंदिरातही भक्तांना नो एंट्री

DELHI : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता मंदिरातही भक्तांना नो एंट्री

Subscribe

गेली दोन वर्षे कोरोनाच्या गर्तेत अडकलेल्या जगात आता पुन्हा ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निंर्बंध लादले जात आहेत. दिल्लीत ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अरविंद केजरीवाल यांनी येलो अलर्ट जाहीर केला आहे. यातच देशाची राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिराचे महंत सुरेंदर नाथ अवधूत यांनी भक्तांची मंदिरात प्रवेशबंदी केली आहे. दक्षिण मुंबईत स्थित कालकाजी मंदिर हे देशभरात प्रसिद्ध आहे. इथे दररोज हजारोंच्या संख्येमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते. या कालकाजी मंदिराच्या महंतांनी या मंदिरात आज ३० डिसेंबरपासूनच भक्तांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. पुढील दिवसांत सरकार जो निर्णय घेईल त्याचेही मंदिर प्रशासन पालन करणार आहे.


आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर थोड्याफार प्रमाणात काही भागात निर्बंध लागू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही डेल्टानंतर आता ओमिक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.विशेष म्हणजे नव वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच जय्यत तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी पार्ट्या केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू करण्याची घोषणा केलीय.त्यामुळे आता मुंबईत जमावबंदी लागू झाली असून, नव वर्षाच्या म्हणजेच ७ जानेवारीच्या शुक्रवारपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. मात्र दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातीलही मंदिरात भक्तांना प्रवेशबंदी केली जाईल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ही तर तिसऱ्या लाटेची सुरुवात

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. मागच्या महिन्यात कोरोना केसेस १५० च्या आसपास होत्या त्या आता अडीच हजारापर्यंत पोहोचल्या आहेत. ही तिसर्‍या लाटेची सुरुवात असू शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.शाळा, कॉलेज बंद करण्याबाबत अजून काहीही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगताना आवश्यकता पडल्यास पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी लस अधिक प्रभावी, WHO वैज्ञानिकांचे मत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -