घरमुंबईबेस्टमधील संपाला जबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी

बेस्टमधील संपाला जबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी

Subscribe

मुंबई महापालिकेशी संलग्नित असलेल्या बेस्ट उपक्रमात भाडे तत्त्वावरील खासगी बसगाड्यांवरील चालकांनी वेतन न मिळाल्याने दोन संप केला. त्यामुळे प्रवाशांचे,शालेय विद्यार्थ्यांचे भयंकर हाल झाले.

मुंबई महापालिकेशी संलग्नित असलेल्या बेस्ट उपक्रमात भाडे तत्त्वावरील खासगी बसगाड्यांवरील चालकांनी वेतन न मिळाल्याने दोन संप केला. त्यामुळे प्रवाशांचे,शालेय विद्यार्थ्यांचे भयंकर हाल झाले. त्यामुळे या संपाला जबाबदार कंत्राटदारावर बेस्ट उपक्रमाने दंडात्मक व कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व बेस्ट समितीवरील माजी सदस्य रवी राजा यांनी केली आहे.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना रवी राजा यांनी २२ एप्रिल रोजी लेखी पत्र पाठवले असून त्या पत्रात त्यांनी खासगी बसवरील चालकांना वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या व त्यामुळे झालेल्या संपाला कंत्राटदार एम. पी. ग्रुप जबाबदार असून त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला चांगलाच धडा शिकवावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रम, भाडे तत्त्वावरील खासगी बस गाड्यांचा व त्यावरील चालकांचा पुरवठादार कंत्राटदार एम.पी. ग्रुप याला करार व अटी – शर्तीनुसार प्रति किलोमिटर या प्रमाणे ठरलेले दर व त्याची एकूण रक्कम अगोदरच देत असते. तरीही ‘त्या’ कंत्राटदाराने बस गाड्यांवरील चालकांचे वेतन थकविणे चुकीचे आहे. वेतन न मिळाल्याने दोन दिवस संप झाला.

‘काही शाळेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असताना त्यांना, त्यांच्या पालकांना व एकूणच प्रवाशांना खूप त्रास झाला. त्यांना रिक्षा, टॅक्सीने महागडा प्रवास करावा लागला. तसेच, या बसगाड्यांची सेवा पुरविणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या चांगल्या प्रतिमेला तडा गेला. बेस्टचे नाव खराब होत आहे. या सर्व घटनेला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून त्याच्यावर बेस्टने दंडात्मक कारवाई करून बेस्टला झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे आणि त्या कंत्राटदारावर कडक कारवाई करावी’, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. त्यामुळं आता यावर बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा नेमकी काय भूमिका घेतात व काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालीसा’चा वाद : बाळासाहेब थोरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -