घरक्रीडाGT vs KKR IPL 2022 : हार्दिक पांड्या पुन्हा चमकला; गुजरातचा कोलकातावर...

GT vs KKR IPL 2022 : हार्दिक पांड्या पुन्हा चमकला; गुजरातचा कोलकातावर ८ धावांनी विजय

Subscribe

आयपीएलमध्ये शनिवारी आणखी एक रोमांचक सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ धावांनी पराभव केला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने १५६ धावा करत कोलकाताला १५७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४८ धावा केल्या.

गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. सॅम बिलींग्जला मोहम्मद शम्मीने पहिल्या षटकांत बाद करत कोलकाताला पहिला धक्का दिला. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकांत सुनील नरायणला देखील बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा देखील स्वस्तात बाद जाले. अय्यरला यशने तर राणाला फर्ग्युसनने बाद केले. यानंतर रिंकू सिंगने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूत ३५ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रिंकू सिंगला यशने बाद करत कोलकाताला आणखी एक धक्का दिला. शेवटच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मा६, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. गुजरातकडून शमी, यश, राशीद खानने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

- Advertisement -

तत्पूर्वी, कर्णधार हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने १५६ धावांची मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय गुजरातने घेतला. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शुभमन गिल (७) स्वस्तात बाद झाला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने सलामीवीर वृद्धीमान साहासोबत भागिदारी करत संघाला सावरले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७५ धावांची भागिदारी केली. उमेश यादवने साहाला बाद करत जोडी फोडली. त्यानंतर पांड्याने डेव्हीड मिलरसोबत मैदानावर जम बसवला. शिवम मावीने मिलरला बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला. यानंतर आलेल्या तेवातिया, राशीद खान, मनोहर स्वस्तात बाद झाले. अष्टपैलू आंद्रे रसेलने एका षटकांत ५ धावा देत ४ गडी बाद केले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -