घरमुंबईडेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ; साथीच्या आजारांचा विळखा

डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ; साथीच्या आजारांचा विळखा

Subscribe

काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे शहरात लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जूनमध्ये मुंबईत 297 डेेंग्यूसदृश रुग्ण आढळले होते. यामध्ये जुलैच्या 15 दिवसांतच हा आकडा 369 वर पोहोचला आहे. डेंग्यूसदृशबरोबरच लागण झालेल्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, या महिन्यात आतापर्यंत 1६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहेे. त्यामुळे मुंबईला लेप्टो व डेंग्यूचा विळखा बसला असल्याचे दिसून येते.

जुनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली जूनमध्ये डेंग्यूसदृश्य 297 रुग्ण आढळले असले तरी तपासणीनंतर त्यातील 21 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. जुलैमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 15 जुलैपर्यंत डेंग्यूसदृश्य रुग्णांचा आकडा तब्बल 369 वर पोहचला तर 16 जणांना लागण झाल्याचे आढळून आले. एकीकडे लेप्टोमुळे लोकांचा बळी जात असताना डेंग्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने मुंबईकरांना डेंग्यू, लेप्टोचा विळखा पडल्याचे दिसून येते.

१७ वर्षाच्या मुलाचा लेप्टोने मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्याबाबतचा अहवाल समितीकडे पाठवला असून हा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. शहरातील वाढत्या साथीच्या आजारांबाबत पालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. ताप आल्यावर तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे.
– डॉ. पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

- Advertisement -

दोन महिन्यांत आढळलेले रुग्ण

                जून      जुलै (15 तारखेपर्यंत)
डेंग्यू            21      16
लेप्टो            05      19
मलेरिया      356     192
गॅस्ट्रो          779     519
हेपेटाईटीस     94     49

लेप्टोचा आणखी एक बळी

वरळी येथे राहणार्‍या 17 वर्षीय तरुण काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामध्ये वरळी सी फेस व अन्य ठिकाणी भिजण्यास गेला होता. ताप आल्याने त्याने महापालिकेच्या दवाखान्यात दाखवले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने 12 जूनला तो केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. परंतु त्याला श्वासोच्छवासाला त्रास होऊ लागल्याने त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. या मुलाचा मृत्यू लेप्टोने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -