घरमुंबईधारावीला ख्रिसमस गिफ्ट; २४ तासात एकही नवीन रुग्ण नाही!

धारावीला ख्रिसमस गिफ्ट; २४ तासात एकही नवीन रुग्ण नाही!

Subscribe

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल आता कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. आज ‘ख्रिसमस’ च्या दिवशी धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे धारावीतील नागरिकांसाठी आज सणाच्या दिवशी एक चांगली आनंददायी बातमी मिळाली आहे. यासंदर्भातील माहिती धारावी येथील पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. धारावीत गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. केवळ १२ रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ८ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत तर ४ रुग्ण पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत धारावीतील रुग्णांची एकूण संख्या ३ हजार ७८८ एवढी असून १२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत बरे झाल्याने डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ४६४ इतकी आहे.

चहल यांनी केली होती धारावीत पाहाणी!

मे महिन्यात जेव्हा मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त इकबाल चहल यांनी आयुक्तपदाचा पदभार हाती घेतला त्यावेळी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावी विभाग कोरोना हॉटस्पॉट होता. मात्र तरीही नवीन आयुक्त चहल यांनी दुसऱ्याच दिवशी धारावी परिसरात भेट देऊन पाहणी केली होती आणि धारावीत कोरोनाबाबतच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी आयुक्तांनी धारावीतील अस्वच्छ अशा शौचालयात भेट देऊन स्वतः पाहणी केली होती. तसेच, तेथील सर्वजनिक शैचालये तातडीने नियमित स्वच्छ ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

- Advertisement -

आता धारावी विभागाची जबाबदारी जेव्हापासून आयुक्त इकबाल चहल यांनी स्वीकारली तेव्हापासून विविध उपाययोजना केल्याने कोरोनाच्या भयंकर स्थितीचा मुकाबला करणे पालिकेला शक्य झाले. धारावीत २४ डिसेंबर रोजी कोरोनाचे फक्त ३ रुग्ण आढळून आले होते. तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ एवढी होती. तसेच, डिस्चार्ज रुग्णांची संख्या ३ हजार ४६० एवढी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -