घरमुंबईठाणे रेल्वे स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा

ठाणे रेल्वे स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा

Subscribe

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसत असल्याने फेरीवाल्यांची समस्या जैसे थे आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा असल्याने ठाणेकरांना रस्त्यावरून चालणेही कठीण होऊन बसले आहे. तसेच पदपथांवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मोकळे पदपथ कधी मिळणार? असा प्रश्न ठाणेकरांना उपस्थित होत आहे. रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसत असल्याने फेरीवाल्यांची समस्या जैसे थे आहे.

छाया – अमित मार्कंडे

पालिकेच्या कारवाईनंतरही फेरीवाल्यांचे बस्तान

रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर परिसर हा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित केला आहे. मात्र तरीसुद्धा फेरीवाले बिनधास्तपणे बसत आहेत. रस्त्यावर व पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान थाटल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मधल्या काळात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई थंडावली होती. ठाण्यातील स्टेशन परिसर, गोखले रोड, बी केबिन, मुख्य बाजार पेठ, एस. टी. स्टँड आदी परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पालिका आयुक्त जयस्वाल यांनी रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कामालाही लागले आहेत. मात्र पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा बसतात. त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना खूपच त्रास व अडचणींचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तसेच सॅटीसच्या लगत असलेल्या पादचारी पुलावरही फेरीवाल्यांनी बस्तान बसविल्यामळे सकाळी व संध्याकाळी पुलावर कोंडी होत असते. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन रेल्वे स्थानक परिसरात उभे असतानाही फेरीवाले बिनधास्तपणे रस्त्यावर ठाण मांडून असतात. त्यामुळे पालिकेच्या पथकाचेही भय फेरीवाल्यांना नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -